Sitafal Lagwad: Success Story of Farmer | Custard Apple Farming Saam tv
ऍग्रो वन

Sitafal Lagwad: उच्च शिक्षित भावांनी फुलवली सीताफळाची बाग; अडीच एकरात आतापर्यंत २ टनाचे उत्पादन

Sitafal Lagwad | Washim News: अल्पभूधारक शेतकरी विलास जाधव आणि कैलास जाधव या दोन भावांनी तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून सिताफळाची लागवड केली

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम:

Sitafal Chi Lagwad

शेती परवडत नाही, असे म्हटले जाते. त्याला कारणही आहे. बाजारपेठेत शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागते. परंतु योग्य नियोजन केल्यास कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न घेता येत असल्याचे वाशिमच्या (Washim) रिसोड तालुक्यातील घोंसरच्या दोन पदवीधर अल्पभूधारक (Farmer) शेतकरी भावांनी दाखवून दिले आहे. जिद्द, मेहेनत आणि आपल्या शिक्षणाचा फायदा शेतीमध्ये घेत सीताफळ बागेचे योग्य पध्दतीने नियोजन करून २ टन सीताफळाचे उत्पादन घेत विकली आहेत. (Latest Marathi News)

घोंसर येथील अल्पभूधारक शेतकरी विलास जाधव आणि कैलास जाधव या दोन भावांनी तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून सिताफळाची लागवड केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड केल्यामुळे अडीच एकरात १ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यावर्षी चांगला बहार आल्यामुळे एक लाख रुपयाचे उत्पन्न आतापर्यंत घेतले असून राहिलेल्या दोन बारमध्ये दोन लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. मागील ३ वर्षात बागेसाठी त्यांनी ९० ते ९५ हजार रूपये खर्च केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीताफळाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकावर मिलीबग या त्रिप्स रसशोषक किडीवगळता अन्य कोणताही प्रादुर्भाव होत नाही. मात्र यावर्षी फूलधारण करतांना सुरुवातीला पाऊस जास्त झाल्यामुळे फळ धारणावेळी मोठ्या अडचणी आल्या. मात्र, कृषी क्षेत्रात अनुभव असल्याकारणाने जाधव यांनी कुत्रिमरित्या परागीकरण फुला फळासाठी योग्य नियोजन केले. एका आठवड्यापूर्वी विलास पाटील यांच्या सीताफळाच्या फळाचा पहिला तोडा झाला आहे. यामध्ये त्यांना ४० ते ६० रूपये किलो भाव मिळाला. आतापर्यंत जवळपास २ टन सीताफळे विकली गेली असून अजून ३ ते ४ टन फळे निघतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT