Parbhani Zp News : १५४ शिक्षक व कर्मचाऱ्यांना पाठविले घरी; बनवेगिरी करत मिळविली होती नोकरी

Parbhani News : परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या काळात तीन वर्षामध्ये ५३ जावक क्रमांकामध्ये उपरीलेखनाच्या नोंदी घेत संबंधितांच्या संचिकांना मान्यता देण्यात आल्याचे नमूद
Parbhani Zp News
Parbhani Zp NewsSaam tv
Published On

परभणी : परभणीच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची (Parbhani) भरती झाली होती. ही भरती जावकी क्रमांकामध्ये फेरफार करत चुकीच्या पद्धतीने भरती झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यात भरती झालेले १५४ शिक्षक (Teacher) व कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Parbhani Zp News
Bhandara Accident: भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी

परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या काळात तीन वर्षामध्ये ५३ जावक क्रमांकामध्ये (Zilha Parishad) उपरीलेखनाच्या नोंदी घेत संबंधितांच्या संचिकांना मान्यता देण्यात आल्याचे नमूद केले. या नोंदीनुसार १५४ जणांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थेट नोकरी मिळवली होती. फसवणूक व बनवेगिरी करत मिळविलेल्या नोकरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parbhani Zp News
Nandurbar News : नंदुरबारमध्ये मध्यरात्री हॉटेलला भीषण आग; ४ ते ५ लाखांचे नुकसान

त्यांची सेवा समाप्ती व अधिकाऱ्यांवरही कारवाई 

नोंदविलेल्या जावक क्रमांकाच्या खाली रिकाम्या असलेल्या जागेवर उपजावक क्रमांक टाकून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नोकरी मिळविणाऱ्या १५४ जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी नुकतेच काढले आहेत. त्याशिवाय संबंधितांना देण्यात आलेल्या वेतनाची वसुली, दोषी असलेल्या शिक्षण विभागातील (Education Department) अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com