Cold Wave : धुळे, परभणीत थंडीचा जोर वाढला; तापमानात घसरण

Dhule Parbhani News : मागील आठवडाभरापासून थंड वारे वाहू लागल्याने तापमानात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे थंडीचा जोर देखील वाढला आहे
Cold Wave
Cold WaveSaam tv
Published On

धुळे/परभणी : यंदा उशिराने थंडीची चाहूल लागली आहे. मात्र मागील आठवडाभरापासून थंड वारे वाहू (Dhule) लागल्याने तापमानात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे थंडीचा जोर देखील वाढला आहे. यात धुळे जिल्ह्यात तापमान ८.४ अंश तर (Parbhani) परभणीमध्ये ९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले आहे.  (Maharashtra News)

Cold Wave
Solapur Latest News : 'सोलापूर'वरुन भाजपच्या दोन आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध; नेमकं काय झालं?

धुळ्यात थंडीचा जोर कायम
धुळ्यात थंडीचा जोर आज देखील कायम आहे, २५ डिसेंबरला धुळ्यात ८.४ अंश इतक्या तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात थंडीचा जोर कायम असल्याचे बघायला मिळाले असून, धुळेकरांना वाढत्या थंडीचा अनुभव घेता येत आहे.  सकाळी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना हा वाढता थंडीचा अनुभव घेता येत असून सकाळी घराबाहेर पडताना नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम व उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर (Cold Wave) अशाच प्रकारे कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cold Wave
Grapes Farming: द्राक्ष बागेची संरक्षण शेती; शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानपासून शेतकरी मात्र वंचित

परभणीतही पारा घसरला

परभणी शहरासह जिल्हाभरात गेल्या मागील आठ दिवसांपासून परभणीकरांना हुडहुडी भरली आहे. किमान तापमानात काही दिवसांपासून सातत्याने घट होत आहे. आज देखील परभणीचे तापमान ९.५ अंशावर पोहोचले आहे. या वर्षातील सर्वांत कमी तापमान  झाले आहे. थंडी वाढल्याने नागरिक, महिला, विद्यार्थी, स्वेटर, मफलर, जॅकीट असे उबदार कपडे परिधान करत आहेत. जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असल्याने बदलत्या वातावरणाने सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यासह विविध आजारांच्या देखील तक्रारी वाढल्या आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com