Solapur Latest News : 'सोलापूर'वरुन भाजपच्या दोन आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध; नेमकं काय झालं?

Solapur Political News : आमदार सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांनी केले. सोलापूर हे खेडं आहे या आमदार सुभाष देशमुखांच्या म्हणण्यात तथ्य आहे.
Solapur Latest News
Solapur Latest NewsSaam TV
Published On

Solapur News :

भाजपच्या दोन आमदारांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे,निमित्त ठरलं सोलापूर. सोलापूर हे खेडे असल्याच्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

सोलापूर हे मोठं खेडं आहे. याचा आणखी विकास करून कसे मोठे करता येईल. याचा नावलौकिक कसा वाढवता येईल यासाठी काम केले पाहिजे, असं वक्तव्य आमदार सुभाष देशमुख यांनी केले होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Solapur Latest News
Loksabha Election 2024 : निवडणुकीआधीच महायुतीत बिनसणार?; मावळ लोकसभेच्या जागेवरुन तिन्ही पक्षात रस्सीखेच

मात्र यातील सुभाष देशमुखांच्या 'खेडे' या शब्दाला भाजपचे दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्षेप घेतला. सुभाष बापू खेडं का म्हणाले कळले. जिल्ह्यात सोन्याचा धूर निघत होता. येथील चादरीचे कारखाने प्रसिद्ध होते. (Latest Marathi News)

दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांनी केले. सोलापूर हे खेडं आहे या आमदार सुभाष देशमुखांच्या म्हणण्यात तथ्य आहे. कारण इथला शिकलेला मुलगा आज बाहेर चालला आहे. तो बाहेर गेला की दोन वर्षात घर घेतो, मात्र इथला मनपा कर्मचारी 20 वर्षे घर घेऊ शकत नाही.

Solapur Latest News
Lok Sabha Survey: लोकसभा निवडणुकीत राज्यात NDA की INDIA आघाडी, मैदान कोण मारणार? सर्व्हेने सगळ्यांनाच दिलाय आश्चर्याचा धक्का

सत्ताधारी आमदारांच्या विधानामुळे सोलापूर जिल्ह्याचा विकास झाला की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. विकासाच्या मुद्द्यावर भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपल्याने, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com