आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (India Alliance) आतापासूनच तयारीला लागली आहे. नवीन वर्षात एप्रिल किंवा मे महिन्यात देशभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजप तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे. तर इंडिया आघाडीही आपण विजय होणार असल्याचा दावा करत आहे. दरम्यान, एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे. यामध्ये राज्यात महायुतीला मोठा धक्का बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडी मागे टाकू शकते, अशी शक्यता वळवण्यात आली आहे. राज्यात एनडीए आघाडीला 19-21 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 26-28 जागा मिळण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भाजप युतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा समावेश आहे. इंडिया आघाडीत राज्यात काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा समावेश आहे. राज्यातील मतांची टक्केवारी पाहिली तर येथेही इंडिया आघाडीला 41 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर एनडीएला 37 टक्के मते मिळण्याची शक्यता वळवण्यात आली आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास येथे भाजपला मोठा धक्का बसू शकतो. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. ज्यामध्ये एनडीएने एकूण 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. तर युपीएला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला 18, राष्ट्रवादीला 4 आणि काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती. त्याचवेळी एआयएमआयएमचा एक खासदारही विजयी झाला होता.
पश्चिम बंगालमध्ये कोणाला किती जागा मिळण्याची शक्यता?
सर्वेक्षणात पश्चिम बंगालच्या जागांचीही माहिती देण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपला 16-18 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला 0 ते 2 जागा आणि ममता बॅनर्जी यांच्या टीम एसीला 23-25 जागा मिळू शकतात.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या, तर टीएमसीने 22 जागा जिंकल्या होत्या. तर 2 जागा काँग्रेसच्या खात्यात गेल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.