Sakshi Malik: साक्षी मलिक निवृत्तीचा निर्णय घेणार मागे? राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

WFI Suspension: आता भारतीय कुस्ती महासंघाच्या वादात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवीन कार्यकारिणीला बरखास्त केलं आहे.
Sakshi Malik
Sakshi Malik Saam Tv
Published On

Wrestler Sakshi Malik News:

आता भारतीय कुस्ती महासंघाच्या वादात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवीन कार्यकारिणीला बरखास्त केलं. कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांनी घेतलेले निर्णयही रद्द करण्यात आले आहेत.

संजय कुमार सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली होती की, उत्तर प्रदेशात कुस्तीसाठी अंडर-15 आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. आता कुस्ती महासंघाची नवीन कार्यकारिणीला बरखास्त केल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकनेही आपली प्रतिकिया दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sakshi Malik
Tanaji Sawant Car Accident: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात

कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, "मला अद्याप लेखी काहीही दिसले नाही. मला माहित नाही की फक्त संजय सिंह याना निलंबित करण्यात आले आहे की, संपूर्ण महासंघाला बरखास्त करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

ती म्हणाली, ''माझा लढा सरकारशी नव्हता. आमचा लढा महिला कुस्तीपटूंसाठी आहे, मी माझी निवृत्ती जाहीर केली आहे, पण आगामी कुस्तीपटूंना न्याय मिळावा, अशी माझी इच्छा आहे.''

Sakshi Malik
Breaking News: मोठा निर्णय! राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त, संजय सिंग यांचे निलंबन

पद्मश्री पुरस्कार परत करणाऱ्या बजरंग पुनियाने सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तसेच पुरस्कार परत करण्याचा निर्णय मागे घेणार असल्याचं तो म्हणाला आहे. तसेच विनेशनेही आपला लढा सरकारविरोधात नसल्याचे म्हटले आहे. हा निर्णय खेळाडूंच्या हिताचा आहे, असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com