"माझ्याकडे 5 ते 6 दिवसांपूर्वी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यांनी मला विनंती केली, की तुम्ही छगन भुजबळ यांच्यावर बोलू नका. मी म्हटलं ठीक आहे, पण 'त्यो'का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजवलाच समजा", असं मी शिष्टमंडळाला सांगितल्याचं मनोज जरांगे यांनी भरसभेत सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला हजारो मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना जरांगे यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. इतकंच नाही, तर आम्ही पोलीस केसला घाबरत नसल्याचंही जरांगे म्हणाले.
"मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल. तुम्ही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं टेन्शन घेऊ नका. असा धीरही जरांगे यांनी मराठा समाजाला दिला. आरक्षणासाठी आपण सरकारला आधी ३ महिने वेळ दिला होता. त्यानंतर सरकारने पुन्हा ३० दिवसांचा वेळ मागितला. शिंदे समितीला राज्यभरात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या", अशी माहिती जरांगे यांनी दिली.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "याच नोंदी पाहून सरकारने ७० वर्षांपूर्वी आरक्षण दिलं असतं तर मराठा समाज नंबर १ झाला असता. तुम्ही मराठ्यांना खवळू नका, नोटीसा पाठवल्यानंतरही आम्ही मुंबईत येणारच आहोत, आम्हाला मुंबईतील अभिनेत्यांना बघायचं आहे", असा टोलाही जरांगे यांनी भरसभेतून हाणला.
"दोन दिवसात सरकार मराठा आरक्षणावर मार्ग काढेल, पण तुम्ही आता माघार घेऊ नका. जातीपेक्षा नेत्यांना मोठं मानू नका. आपल्याला आपल्या लेकरांना मोठं करायचं आहे. तुमचे पाठबळ असल्यावर मी मरायलाही घाबरत नाही. फक्त तुम्ही पूर्ण ताकदीने गावागावात आंदोलन करा, एकजूट वाया जाऊ देऊ नका", असं आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.