New Vande Bharat Express: मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस मुहूर्त ठरला; 'या' तारखेपासून सुसाट धावणार, तिकीट दर किती?

Mumbai-Jalna Vande Bharat Train News: मुंबई ते जालना या मार्गावर 'वंदे भारत' सुरू होणार असून उद्घाटनाचा मुहूर्त देखील ठरला आहे.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressSaam tv
Published On

Mumbai-Jalna Vande Bharat Express Route Soon

देशभरात आपल्या वेगामुळे परिचित असलेली वंदे भारत एक्सप्रेस लवकरच मराठवाड्यातून सुद्धा धावणार आहे. मुंबई ते जालना या मार्गावर 'वंदे भारत' सुरू होणार असून उद्घाटनाचा मुहूर्त देखील ठरला आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते जालना, तसेच जालना ते मुंबई अंतर कमी वेळात गाठता येईल. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vande Bharat Express
LPG Cylinder Price: खुशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त; भाव 'इतक्या' रुपयांनी घसरले, वाचा तुमच्या शहरातील नवे दर

मराठवाड्यातील अनेक व्यावसायिक तसेच नोकरदार कामासाठी मुंबईत येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई-जालना मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याचं सूतोवाच केलं होतं. यासाठी रेल्वे रूळाचे कामही वेगात सुरू करण्यात आलं. (Latest Marathi News)

दरम्यान, येत्या ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ नव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती आहे. यामध्ये अयोध्या-आनंद विहार, नवी दिल्ली-वैष्णवो देवी, अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बेंगलोर आणि जालना-मुंबई (Mumbai) वंदे भारतचा देखील समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान जालना येथून निघणार आहे. ही रेल्वे सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणार आहे. त्याचबरोबर मुंबई येथून ही ट्रेन दुपारी १.३० वाजता निघणार आहे. सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान वंदे भारत जालन्यात पोहचणार, अशी देखील माहिती आहे.

जालना येथून सुटणाऱ्या मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक इगतपुरी, ठाणे हा थांबा मिळणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे ट्रेनच्या तिकीट दर किती राहणार? याची माहिती अद्याप समोर आली नाही. तिकीटाचा दर १००० ते १२०० रुपये इतका असू शकतो, असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Vande Bharat Express
Terrorist Attack: दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर कसा केला हल्ला? जखमी सैनिकाने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com