Rabi Hangam
Rabi HangamSaam tv

Rabi Hangam : पावसाअभावी रब्बी हंगामात घट; ऊस लागवड क्षेत्रात मात्र वाढ

Dhule News : धुळे जिल्ह्यात ४ हजार ५३० यावर्षी हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीसाठी निश्चित केले आहे. मात्र धुळे, साक्री, शिंदखेडा या तालुक्यात प्रस्तावित पेक्षा कमी ऊस लागवड झाली
Published on

धुळे : धुळे जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अनियमित पावसाचा फटका रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. (Rain) पावसाच्या अनियमितेमुळे रब्बीच्या हंगामात जरी घट (Dhule) झालेली असली, तरी शिरपूर तालुक्यात मात्र उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (Live Marathi News)

Rabi Hangam
Poultry Farm : भात शेतीला जोडधंदा; १ हजार तरुण शेतकरी करताय एसी पोल्ट्री फार्म व्यवसाय

धुळे जिल्ह्यात ४ हजार ५३० यावर्षी  हेक्टर क्षेत्र (Sugarcane) ऊस लागवडीसाठी निश्चित केले आहे. मात्र धुळे, साक्री, शिंदखेडा या तालुक्यात प्रस्तावित पेक्षा कमी ऊस लागवड झाली. मात्र शिरपूर तालुक्यात पाण्याची मुबलकता असल्याने येथे २ हजार ४११ हेक्टर ऊस लागवड असताना प्रत्यक्षात २ हजार ९०६ हेक्टर ऊस लागवड झालेली आहे.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rabi Hangam
Jalgaon News : पिकांच्या संरक्षणासाठी कुंपणाला वीज प्रवाह; स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू

पावसाळ्यात चांगला पाऊस झाला नसल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा लागवड केलेली नाही. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत ९० हजार १२४ पैकी फक्त ६१ हजार ७६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com