Poultry Farm : भात शेतीला जोडधंदा; १ हजार तरुण शेतकरी करताय एसी पोल्ट्री फार्म व्यवसाय

Maval News : पारंपरिक भाताच्या पिकांबरोबरच शेतकरी आता जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन करू लागला आहे. मावळातील अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन हा जोडधंदा सुरू करून त्यात यश देखील मिळवले आहे
Poultry Farm
Poultry FarmSaam tv
Published On


मावळ : इंद्रायणी भाताचे आगार म्हणून मावळ तालुका प्रसिध्द आहे. पण अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं होत असल्याने (Maval) मावळातील तब्बल एक हजार तरुण शेतकरी पोल्ट्री फार्मच्या व्यवसायात उतरले आहे. यासाठी लागणारे कर्ज पीडिसीसी बँक मार्फत देण्यात येत असल्याने येथील शेतकऱ्यांना पुणे जिल्हा बँकेने तारले असल्याने (Poultry Farm) कुक्कुटपालन व्यवसायातून रोजगार निर्मिती झाल्याचं पुणे जिल्हा बँक संचालक माऊली दाभाडे यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

Poultry Farm
Beed News : ग्रामस्थांनी चक्क गाव काढले विक्रीला; मूलभूत सुविधा नसल्याने गावकरी संतप्त

मावळ तालुका हा इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध आहे. मावळमधील सर्वच शेतकरी हे भाताचे पीक घेतात. परंतु आता या पारंपरिक भाताच्या पिकांबरोबरच शेतकरी आता जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन करू लागला आहे. मावळातील अनेक (Farmer) शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन हा जोडधंदा सुरू करून त्यात यश देखील मिळवले आहे. आतापर्यंत कुक्कुटपालन हा व्यवसाय केवळ पारंपरिक पद्धतीने लाईटचे बल्ब लावून करण्यात येत होता. परंतु कालानुरूप बदलून शेतकऱ्यांनी बारामती एसी पोल्ट्री फार्म तयार केले आहेत. यामुळे आता पक्षांना संसर्ग देखील कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मोठ्या प्रमाणात मिळू लागला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Poultry Farm
Bribe Trap : दहा हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षकासह, शिपाई ताब्यात

कर्जासाठी बँकाही येताय पुढे 

एसी पोल्ट्री फार्म तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च आहे. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात फायदा देखील होत असल्याचं संभाजी केदारी या शेतकऱ्याने सांगितले आहे. शेतकऱ्यांना बँका अगोदर कर्ज देण्यास अनुकूल नव्हते. मात्र पोल्ट्री व्यवसायातून शेतकऱ्यांची उंच भरारी पाहून आमच्याच बँकेतून कर्ज घेण्याचं साकडे सध्या बँकिंग क्षेत्रात मावळ तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाने शेतीत नुकसान झालं तरी जोडधंदा म्हणून कुकुटपालन हा व्यवसाय करावा असं आवाहन संभाजी केदारी या तरुण शेतकऱ्यांने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com