Wardha : वीजपुरवठा खंडीत झाल्याने १९७० कोंबड्यांचा मृत्यू; शेतकऱ्याकडून तक्रार दाखल

1970 hens die due to power Supply Cut in a poultry farm in Wardha : पोल्ट्री फॉर्मचे तापमान नियंत्रित ठेवण्याकरिता शेतकऱ्याने शेडमध्ये तीन एकसोस्ट फॅन आणि दोन मोठे कुलर लावले होते.
1970 hens die due to power Supply Cut in a poultry farm in Wardha
1970 hens die due to power Supply Cut in a poultry farm in Wardhaसंजय डाफ

वर्धा: देवळी तालुक्यातील मलातपूर येथे अचानक विद्युत पुरवठा खंडित (Power Supply Cut) झाल्याने पोल्ट्री फॉर्ममधील (Poultry Farm) तब्बल 1970 कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाला. या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पोल्ट्री फॉर्ममधील तापमानात वाढ झाली आणि यातच कोंबड्यांचा (Hens) मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. शेतकऱ्याने या प्रकरणाची देवळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हे देखील पाहा -

1970 hens die due to power Supply Cut in a poultry farm in Wardha
दुकानांच्या पाट्या मराठीत लावा अन्यथा...; कल्याण डोंबिवली महापालिकेचा इशारा

मलातपूर (Wardha) येथे सागर पजगाडे यांचे आठ हजार पक्ष्याची क्षमता असलेले कुक्कुटपालन केंद्र आहे. स्वतःच्या शेतीला जोडधंदा म्ह्णून बँक ऑफ इंडिया येथून १५ लाखांचं कर्ज काढत व्यवसाय सुरु केला. त्यांचा व्यवसाय जोमात असतांना वीज वितरण कंपनीकडून परिसरातील विजपूरवठा महावितरणणे कामासाठी खंडित केला. तब्बल पाच तास खंडीत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे पोल्ट्री फॉर्ममधील तापमानात वाढ झाली. पोल्ट्री फॉर्मचे तापमान नियंत्रित ठेवण्याकरिता शेतकऱ्याने शेडमध्ये तीन एकसोस्ट फॅन आणि दोन मोठे कुलर लावले होते. सोबतच वेळोवेळी पाण्याचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवले जाते. मात्र विद्युत पुरवठा बंद असल्याने हे सर्व बंद होते आणि यामुळे शेतकऱ्याच्या कोंबड्यांचा मृत्यू झालाय.

1970 hens die due to power Supply Cut in a poultry farm in Wardha
Amravati : पाईपलाईन दुरुस्तीसाठी अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

शेतकऱ्याने या प्रकरणाची देवळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. प्राथमिक दृष्ट्या उष्माघातने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com