दुकानांच्या पाट्या मराठीत लावा अन्यथा...; कल्याण डोंबिवली महापालिकेचा इशारा

राज्य सरकारने दुकानांवरील बोर्ड मराठीत असावेत असे निर्देश दिले होते.
KDMC News
KDMC NewsSaam TV

कल्याण/डोंबिवली : दुकानावरील प्रमुख नामफलक म्हणजेच पाट्या मराठीत लावा अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल असा इशारा कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने शहरातील दुकानारांना दिला आहे. याबाबत शासनाच्या आदेशानुसार पालिका आयुक्तांनी शहरातील दुकानदार, आस्थापना सूचना दिल्या आहेत. (Kalyan Dombivali Latest Marathi News)

KDMC News
Ulhasnagar: गावठी दारू बनवण्यासाठी वापरला जाणारा काळा गुळ जप्त; हिल लाईन पोलिसांची कारवाई

राज्य सरकारने दुकानांवरील बोर्ड मराठीत असावेत असे निर्देश दिले होते. परंतु अद्यापही अनेक दुकानदारांनी इंग्लिशमध्ये पाट्या लावल्या आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे आता महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापना यांना आपले नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असणार आहे. महापालिका क्षेत्रातील १० प्रभाग अधिकाऱ्यांना संबंधित प्रभागातील दुकाने आणि आस्थापनांना नामफलक  मराठी भाषेत  नाम फलक लावणेबाबत सूचना द्या त्यानंतर ही मराठी पाट्या लागल्या नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत .

KDMC News
मराठी नामफलकांच्या पूर्ततेसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुकानदरांचे प्रमुख नाम फलक मराठीत करण्याचे आदेश शहरातील दुकानदार व्यवस्थापनाना दिले आहेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील महापालिका प्रशासनाने दिला आहे.असं असलं तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय पिपी चेंबर येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. या कार्यालयाचे समोरील आणि लोकांना दिसेल असे नाव हे मात्र इंग्रजीमध्ये असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे या इमारती मधील इतर दुकानांचे मुख्य नाव फलक देखील इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात दिल्याचं दिसून येते. एकीकडे शासन निर्देशांचे पालन करताना महापालिका आयुक्तांनी दुकाने, आस्थापनाचे नामफलक मराठी असाव्यात अन्यथा दुकानदारांना कारवाईचा इशारा दिला तर दुसरीकडे महापालिकेच्या कार्यालयाचे नाव हे  इंग्रजीत आहे . त्यामुळे आता महापालिका प्रशासन हे नाव मराठीत करणार का ? हे पाहावे लागेल.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com