मराठी नामफलकांच्या पूर्ततेसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

विविध व्यापारी संघटनांनी महानगरपालिका प्रशासनाला केलेल्या विनंतीचा विचार करुन ही मुदतवाढ दिली आहे.
BMC
BMCSaam TV
Published On

मुंबई : महानगरातील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी नामफलकाबाबत (Marathi Name Plate) अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विविध व्यापारी संघटनांनी महानगरपालिका प्रशासनाला (BMC) केलेल्या विनंतीचा विचार करुन ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

BMC
RTO च्या 'या' सुविधेचा घरबसल्या मिळणार लाभ; १७ ते १८ लाख नागरिकांना होणार फायदा

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिक्षेत्रात मराठी नामफलकासाठी (Marathi Name Plate) मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता दिनांक ३० जून २०२२ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४, दिनांक १७ मार्च २०२२’ अन्वये ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन(सुधारणा) अधिनियम, २०२२’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमाचे कलम ३६ क (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे.

BMC
धावत्या एक्स्प्रेसमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, तिकिट नसल्याने AC कोचमध्ये नेले

अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र, मराठी भाषेतील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे.तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font Size), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.

अधिनियमातील या तरतुदींच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरातील सर्व व्यापाऱयांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, अधिनियमाच्या सदर तरतुदीनुसार आपल्या दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक प्रथमदर्शनी मराठी देवनागरी लिपीत व इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा मोठ्या आकारात दिसेल, अशारितीने प्रदर्शित करावा.

वाढीव मुदतीत देखील कार्यवाही न करता, अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्यास दुकाने व आस्थापनांच्या मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com