अमर घटारे
अमरावती: अमरावती (Amravati) आणि बडनेरा (Badnera) या दोन शहराला मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र राहाटगाव जवळ काल (गुरुवारी) पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया गेले. या मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने आता हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज आणि म्हणजेच शुक्रवार ३ मे आणि शनिवार ४ मे असे दोन दिवस अमरावती आणि बडनेरा या दोन्ही शहराचा पाणीपुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे अशी माहिती मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी दिली आहे. (Water supply to Amravati, Badnera city closed for two days for pipeline repairs)
हे देखील पाहा -
या मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामामुळे आज आणि उद्या दोन दिवस पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र यानिमित्ताने मजीप्राचा गलथान कारभार त्यानिमित्ताने चव्हाट्यावर आलेला आहेत. कारण शहरात तीव्र पाणी टंचाई असतांना पाईपलाईन फुटली, यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेलं, तर अमरावती शहरातील रहाटगाव जवळील वृंदावन अपार्टनमेंटजवळ पाईपलाईन फुटल्याने तलाव साचला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.