नंदुरबार : सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करू देण्यासाठी २१ हजाराच्या (Bribe) लाचेची मागणी केली. यातील दहा हजार रुपये स्वीकारताना (Sarangkheda) सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. (Breaking Marathi News)
पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील व (Nandurbar) चालक पोलिस शिपाई गणेश भामट्या गावित असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्यांची नवे आहेत. सारंगखेडा (ता.शहादा) येथे श्री दत्त प्रभूंची यात्रोत्सव सुरू झाला आहे. या यात्रेत एका मद्य व्यावसायिकास दारू वाहतूक करण्यास परवानगी मिळावी; म्हणून त्याने पोलिस निरीक्षकांशी संपर्क केला. त्याबदल्यात त्याच्याकडे २१ हजाराची लाचेची मागणी पोलिस निरीक्षक संदीप पाटील व पोलिस शिपाई गणेश गावित यांनी केली. त्यानंतर दहा हजारात तडजोड झाली. याप्रकरणी व्यावसायिकाने नाशिक लाचलुचपत विभागाकडे (ACB) याप्रकरणी तक्रार दाखल केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सापळा रचून पकडले
तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सारंगखेडा येथे सापळा रचत ठरल्यानुसार दहा हजाराची रक्कम स्वीकारताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचा वाहन चालक शिपाई गणेश गावित या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांचा पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.