सागर निकवाडे
नंदुरबार : यंदा कापसाला सुरवातीपासूनच चांगला दर मिळालेला नाही. सात ते साडेसात हजार रुपये क्विंटलच्या (Nandurbar) वर दर गेलेले नाही. सीसीआयचे केंद्र सुरु झाल्यानंतर तरी कापसाला (Cotton) चांगला भाव मिळेल अशी आशा होती. परंतु भाव वाढत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Live Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे लागवड होत असते. परंतु कापसाला मिळणाऱ्या अल्पशा दरामुळे शेतकरी (Farmer) आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापसाला चांगला भाव मिळावा, यासाठी सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत. सीसीआयचे केंद्र सुरू झाल्यानंतर देखील कमी भाव (Cotton Price) आणि कागदपत्रांची मागणी अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रकडे पाठ फिरवल्या असल्याचं चित्र दिसून येत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कापसाला मागील वर्षी देखील अपेक्षित भाव मिळाला नव्हता. यंदा देखील कापसाला सध्या साडेपाच ते साडेसात हजार रुपये क्विंटल मिळत असून, यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला अपेक्षित भाव नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने योग्य भाव ठरवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.