Soyabean Price : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण; १० दिवसात ७०० रुपयांनी दर घसरले

Dharashiv News : सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने अनेकांनी सोयाबीनचा साठा करुन ठेवला आहे. मात्र दर घसरल्याने शेतकऱ्यांची सातत्याने निराशा होत आहे
Soyabean Price
Soyabean PriceSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : सोयाबीनचे दर यंदा हवे तसे मिळाले नाहीत. परंतु दर वाढतील या अपेक्षेत शेतकरी (Farmer) होता. मात्र दर न वाढता त्यात घसरण होत असल्याचेच पाहण्यास मिळत आहे. यात धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यात सोयाबीनचे दर मागील दहा दिवसात ७०० रुपयांनी घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. (Latest Marathi News)

Soyabean Price
Maratha Reservation: जरांगेंचा डाव, सरकारची कोंडी! देशभरात रामलल्लाचा जयघोष अन् राज्यात मराठा आंदोलन तापणार

सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने अनेकांनी सोयाबीनचा साठा करुन ठेवला आहे. मात्र दर घसरल्याने शेतकऱ्यांची सातत्याने निराशा होत आहे. यंदाच्या वर्षात सोयाबीनला जास्तीत जास्त ५  हजार ४०० पर्यंतचा दर (Soyabean Price) मिळाला. त्यानंतर सातत्याने दरामध्ये घसरण होत आहे. ऐकीकडे सोयाबीन उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढत असताना दर कमी होत असल्याने शेतकरी वर्गातुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Soyabean Price
Wada Accident News: मातीने भरलेल्या डंपरने बाप लेकाला चिरडले; केळठण- गोराड रस्त्यावर झाला अपघात

धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीचे क्षेत्र सुमारे ५ लाख हेक्टपर्यंत आहे. यापैकी सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा आहे. मात्र सातत्याने दरात घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता सोयाबीनचा साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना कमी दारात विक्री करावी लागणार असल्याने आर्थिक झळ देखील शेतकऱ्यांना सोसावी लावणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com