Dharashiv: मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचं सत्र सुरूच; धाराशिवात २४ वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून संपवलं जीवन

Dharashiv Latest News in Marathi: धाराशिवातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी २४ वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव

Dharashiv Latest News:

राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी शिंदे सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. यामुळे राज्यभरातील लोकांचं लक्ष मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे लागलं आहे. याचदरम्यान, धाराशिवातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी २४ वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान धाराशिवातील २४ वर्षीय अमरनाथ भाऊसाहेब कदम या तरुणाने जीवन यात्रा संपवली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडली आहे.

२४ वर्षीय अमरनाथ या तरुणाने अंजनसोंडा शिवारातील स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृत अमरनाथ कदम हा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित राहिला होता.तो आरक्षणाच्या या लढ्यात सक्रिय सहभाग घेत होता.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गावातील साखळी उपोषणामध्ये सहभाग नोंदवला होता.

Dharashiv News
Mumbai Crime News | 2 महिन्याच बाळ पळवलं, पोलिसांनी 4 दिवसात कसं शोधलं?

हिंगोलीत 21 वर्षीय तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. काल गुरुवारी पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा खुर्द गावामध्ये तरुणाने गळफास घेत जीवन संपवलं. योगेश कुंडलिक लोणसणे असे 21 वर्षीय गळफास घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. योगेशने शेतातील झाडाला गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे.

Dharashiv News
Thane Crime News: ठाण्यात ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, सापळा रचून पोलिसांनी केला भांडाफोड

औंढा पोलिसांना योगेशच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. योगेशने या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी योगेशचा मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी औंढा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com