Thane Crime News: ठाण्यात ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, सापळा रचून पोलिसांनी केला भांडाफोड

Thane News: सध्या ब्युटी पार्लर, मसाज पार्लर, स्पा आणि हुक्का पार्लरचे सर्वत्र पेव फुटले असून या धंद्यांच्या आडून मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय केला जातो, अशी तक्रार नेहमीच केली जाते.
Thane Crime News
Thane Crime NewsSaamtv
Published On

>> हिरा ढाकणे

Thane Crime News:

सध्या ब्युटी पार्लर, मसाज पार्लर, स्पा आणि हुक्का पार्लरचे सर्वत्र पेव फुटले असून या धंद्यांच्या आडून मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय केला जातो, अशी तक्रार नेहमीच केली जाते. परंतु त्या विरोधात फारशी कारवाई कधी केल्याचे ऐकण्यात येत नाही. परंतु आज नौपाडा पोलिसांनी अशाच एका ब्युटी पार्लरवर धाड टाकून दोन महिलांची सुटका केली आहे.

ठाण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नौपाडा भागात 'शमा फॅमिली ब्युटी सलोन अँड स्पा' या नावाने चालणाऱ्या व्यवसायाच्या आड वेश्याव्यवसाय केला जात असल्याची तक्रार नौपाडा पोलिसांना मिळाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी एक बोगस गिऱ्हाईक पाठवून येथील अवैध वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला. यावेळी स्पाच्या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले व दोन बळीत महिलांची सुटका देखील पोलिसांनी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Thane Crime News
Karnataka Hijab Ban: कर्नाटकात हिजाबवरील बंदी उठणार, काँग्रेस सरकारने केली मोठी घोषणा

इथे सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्वरित पावले उचलत एका बोगस गिऱ्हाईकाला येथे पाठवले. पोलिसांच्या या माणसाने आत जाऊन तेथील मॅनेजरकडे मुलीची मागणी केली. त्याला तिथे बसून स्पा मॅनेजरने त्याच्यासमोर दोन मुलींना उभं केलं आणि त्यातील एका मुलीला निवडण्यास सांगितले.  (Latest Marathi News)

यावरून येथे वेश्याव्यवसाय सुरू आहे, याची खात्री पटताच तोतया गिर्‍हाईकाने बाहेर बसलेल्या पोलिसांना इशारा केला. यानंतर पोलिसांनी तातडीने ब्युटी सलोनवर धाड टाकत तेथील महिला मॅनेजरला ताब्यात घेतले.

Thane Crime News
Lok Sabha Election 2024: लोकसभेसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवार आणि राहुल गांधींच्या बैठकीत काय झाली चर्चा?

याबाबत आमदार संजय केळकर यांना विचारले असता त्यांनी ठाणे हे सांस्कृतिक शहर असून आपण नेहमीच अनधिकृत मसाज पार्लर, स्पा, हुक्का पार्लर व इतर धंद्याबद्दल आवाज उठवल्याचे सांगितले. अशा प्रकारचे कोणतेही अनधिकृत व्यवसाय सुरू असेल तर पोलिसांनी त्या विरोधात तातडीने कठोर पावले उचलावीत निबंध करावेत, असे आवाहन पोलिसांना केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com