कापूस, स्ट्रॉबेरीच्या दरात माेठी घसरण, अमरावतीसह जावळीतील शेतकरी निराशेच्या गर्तेत

यंदा दर मिळेल अशी शेतकऱ्यांना मोठी आशा होती.
cotton and strawberry price slashed farmers worried in maharashtra
cotton and strawberry price slashed farmers worried in maharashtrasaam tv
Published On

- अमर घटारे / ओंकार कदम

Maharashtra News :

ऊसाला, दूधाला, कांद्याला भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यापाठाेपाठ आता कापसू (cotton) आणि स्ट्राॅबेरी (strawberry) उत्पादक शेतकरी देखील उत्पादनाला भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी नैराश्यच्या गर्तेत गेलेले शेतकरी शेतातून पिक उखाडून टाकत आहेत. (Maharashtra News)

कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

यंदाही कापसाचा दर कमी असल्याने शेतकरी मोठा हवालदिल झाला आहे. लाखो रुपये खर्च करून कापसाचे उत्पादन कमी व त्यात भाव नसल्याने संकटात सापडला आहे. बँकांचे कर्जाचे डोंगर कसे फेडावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

अमरावती जिल्ह्यात यंदा कापसाच्या उत्पादनात घट आलेली आहे. दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी 12 हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला होता. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना मोठी आशा होती.

cotton and strawberry price slashed farmers worried in maharashtra
Success Story: दुष्काळी भागात बहरली स्ट्रॉबेरी; करमाळ्यातील इंजिनिअर युवकानं करुन दाखवलं

मात्र अवकाळी पाऊसानंतर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कापूस आता प्रति क्विंटल सहा हजार नऊशे रुपयांवर आला आहे. त्यामूळे शेतक-यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदा सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते. अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच त्याचा फायदा झाला होता. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांचा होता. तो खरा होताना दिसत असतानाच वादळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केला.

cotton and strawberry price slashed farmers worried in maharashtra
Sahitya Akademi Award 2023: कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

स्ट्रॉबेरीला दर मिळेना

स्ट्रॉबेरी या फळाला मार्केटमध्ये दर नसल्याने व खर्च परवडत नसल्याने जावळी तालुक्यातल्या आखाडे गावच्या समीर शेलार या शेतकऱ्यांना चक्क दोन एकर स्ट्रॉबेरी लाल फळासह उखडून फेकून दिली. एकूण 15 लाख रुपयांचे नुकसान या शेतकऱ्याचे झाल्याचा दावा त्याने केला आहे.

अनेक शेतकरी जावळी महाबळेश्वर मध्ये दर नसल्याने अडचणीत आले आहेत. दरवर्षी स्ट्रॉबेरीला नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये चांगला दर मिळत असतो. यावेळी ढगाळ वातावरण व रोगराई. त्याचबरोबर अवकाळी पाऊस आधी विविध कारणांमुळे स्ट्रॉबेरीला दर नसल्यामुळे स्ट्रॉबेरीची बाग पूर्णतः शेतक-याने उखडून टाकली.

Edited By : Siddharth Latkar

cotton and strawberry price slashed farmers worried in maharashtra
Satara Crime News : पुण्यातील शेतकऱ्यांचे 18 लाख लुटले, साता-यात तिघे जेरबंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com