ACB Action : गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसाला दिले ५ हजार; लाच देणारा तरुण ताब्यात

Sangli News : संशयित अभिजित गोरड यांनी त्यांच्या भावाविरोधात दिलेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी लाच देत असताना सदरची कारवाई करण्यात आली
Sangli ACB Action
Sangli ACB ActionSaam tv
Published On

सांगली : एखादे काम करून देण्यासाठी अधिकारी पैशांची मागणी करतात व लाच स्वीकारताना अडकतात. परंतु (Sangli) सांगलीच्या कडेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याला पाच हजारांची लाच देणाऱ्या शेतकरी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाच लुचपत विभागाने कडेगाव पोलीस (Police) ठाण्यातच कारवाई केली. अभिजित नारायण गोरड असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Latest Marathi News)

Sangli ACB Action
Shivsena Political News : शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; पालघरमधील ४ नगरसेवक तर लातूरचे माजी जिल्हाप्रमुख शिंदे गटात

संशयित अभिजित गोरड यांनी त्यांच्या भावाविरोधात दिलेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी लाच देत असताना सदरची कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे कडेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आहेत. संशयित अभिजित गोरड यांनी त्यांच्या भावा विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता. तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी लाच घेण्याचा आग्रह केला. याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाच लुचपत विभागाने पडताळणी केली असता संशयित अभिजित गोरड यांनी पाच हजारांची लाच घेण्याबाबत आग्रह केल्याचे निष्पन्न झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sangli ACB Action
Dhule LCB Action : मेडिकल, एमआरकडून नशेचा काळाबाजार; धुळ्यात एलसीबीची कारवाई, चौघे ताब्यात

रंगेहाथ पकडले 

लाच लुचपत विभागाने कडेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा लावला असता संशयित अभिजित गोरड यांना पाच हजारांची लाच देताना रंगेहात पकडण्यात आले. यानंतर संशयित अभिजित गोरड यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यातच लाच लुचपत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com