Dhule LCB Action : मेडिकल, एमआरकडून नशेचा काळाबाजार; धुळ्यात एलसीबीची कारवाई, चौघे ताब्यात

Dhule News : जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली
Dhule LCB Action
Dhule LCB ActionSaam tv
Published On

धुळे : धुळे एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात (Dhule) आला आहे. या कारवाईत चार जणांकडून गुंगीकारक औषधाच्या सुमारे ५८० बाटल्या व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच हजाराहुन जास्तीच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.  (Breaking Marathi News)

Dhule LCB Action
Anganwadi Worker Strike: अंगणवाडी सेविकांचा १५ डिसेंबरला नागपूरला एल्गार; राहुरी तहसीलवर मोर्चा काढत सरकारला इशारा

राज्यात सध्या ललित पाटील ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असताना धुळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या व गुंगीकारक औषधांचा साठा सापडल्यामुळे पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. (Dhule LCB) एलसीबीने मोहाडी हद्दीतून एका इसमाला ताब्यात घेतले होते. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गुंगीकारक औषधाच्या बाटल्या आढळून आल्या. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule LCB Action
Sangamner News : दुध संघांच्या विरोधात भाजपचे आंदोलन; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी

मेडिकल चालक, एमआरचाही सहभाग 

सदर बाटल्या जप्त करण्यात आल्यानंतर बाटल्यांबाबत विचारपूस केली असता, देवपुरातील विष्णू नगरातील मेडीकलवर काम करणाऱ्या तरुणाकडून बाटल्या आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने मेडीकलवरील तरुणालाही ताब्यात घेत त्याच्याकडून देखील गुंगीकारक औषधांच्या बाटल्या हस्तगत केल्या. यात वाडीभोर परिसरातील राहणाऱ्या एमआरचाही सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्याचा देखील शोध पोलिसांनी घेतला असता त्याच्याकडेही गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांचा साठा पोलिसांना आढळून आला. नशेच्या बाजारातील या चौघांच्या मुस्क्या आवळल्यानंतर आता पोलीस या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आणखी नशेच्या सौदागरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com