सचिन बनसोडे
संगमनेर (अहमदनगर) : दूध दर प्रश्नावर विरोधक आक्रमक होऊन आंदोलन करत आहेत. याच दरम्यान आता भाजप (BJP) देखील आंदोलन करताना दिसून येत आहे. दूधाला ३४ रुपये दर देण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी खासगी आणि सहकारी दूध संघानी करावी; या मागणीसाठी संगमनेर (Sangamner) येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात किर्तनकार इंदोरीकर यांच्या सासूबाई शशिकला पवार या देखील सहभागी झाल्या होत्या. (Tajya Batmya)
राज्यात दूध दर वाढीसाठी विरोधक राज्य सरकार विरोधात आंदोलन करत आहे. मात्र संगमनेरमध्ये (Congress) काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील सहकारी दूध संघ आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर खाजगी आणि सहकारी दुध संघाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सरकारने दुधाला ३४ रूपये दर जाहीर केला असताना दूध संघांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून महायुती सरकारची बदनामी थांबवावी; अशी मागणी यावेळी करण्यात आली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आता गेटवरच आंदोलन
माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शहरात भाजप कार्यकर्ते आज आक्रमक झाले होते. या आंदोलनात किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई आणि निळवंडे गावच्या सरपंच शशिकला पवार या देखील सहभागी झाल्या होत्या. आगामी काळात संगमनेरमधील दूध संघाच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्षपणे बाळासाहेब थोरात यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.