kolhapur, Swabhimani Shetkari Sanghatana News, saam tv
ऍग्रो वन

Swabhimani Shetkari Sanghatana News : पाटबंधारे खात्याच्या बंदीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

या निर्णयामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : राज्यात अवकाळी पावसाचा (unseasonal rains) तडाका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (satara), सांगली (sangli), काेल्हापूर (kolhapur) जिल्ह्यांतील शेतीस देखील माेठा फटका बसला आहे. आता उरलेले शेती जगवण्यासाठी पाण्याची गरज आहे. परंतु पाटबंधारे खात्याने उपसा बंदी घातल्यामुळे काेल्हापूर, इचलकरंजीसह 64 गावांतील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थ पसरली आहे. (Maharashtra News)

कोल्हापूर शहरासह इचलकरंजी व ग्रामीण भागाला 64 खेड्यांना पंचगंगा नदी द्वारे शेतीचे व प्यायचे पाणी पाटबंधारे द्वारे दिले जाते. तसेच उद्योगधंद्यालाही याद्वारे पाणी दिले जाते. सध्या गेल्या काही दिवसापासून उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे धरणाचा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे खात्याने शेती उपशासाठी बंदी घातली आहे.

त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. शेतीला पाणी नाही मिळाले तर हरभरा गहू फुले ऊस या आदी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. पिकाला जर पाणी नाही मिळाले तर शेतीला याचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

इकडे अवकाळी पावसाचा तडाका शेतकऱ्यांना बसला तर आता उरलेले शेती जगवण्यासाठी पाण्याची गरज आहे. पण पाटबंधारे खात्याने बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थ पसरली आहे.

उपसा बंदीचा आदेश कारखान्यांना, उद्याेगांना देखील करावा अन्यथा पाटबंधारे खात्याने बंदी उठवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा बंडू पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, इचलकरंजी) यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT