Pune Bus Accident News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बस अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
Lonavala Accident News, CM Eknath Shinde
Lonavala Accident News, CM Eknath Shindesaam tv

Pune Bus Accident News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील (old pune mumbai express way) झालेल्या खासगी बस अपघातात सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वेदनादायी आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याची घाेषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी ट्विट (tweet) करुन केली आहे. दरम्यान संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल बचाव पथकातील सर्व सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानत त्यांचे कौतुक केले आहे. (Breaking Marathi News)

Lonavala Accident News, CM Eknath Shinde
Satara Covid-19 Update : साता-यात काेराेनाबाधितांची संख्या नव्वदी पार; एकाचा मृत्यू

बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अघातात सुमारे 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती राजगड महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले (sp tanaji chikhale) तसेच रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असेही चिखलेंनी नमूद केले.

Lonavala Accident News, CM Eknath Shinde
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : बावड्यातील शेतकरीच बंटी पाटलांना त्यांची जागा दाखवतील : खासदार धनंजय महाडिक

दरम्यान या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दुख व्यक्त करुन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या दुखात सहभागी असल्याचे ट्विट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करुन अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत (Bus Accident in Lonavala) कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री यांनी जाहीर केली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Lonavala Accident News, CM Eknath Shinde
Kolhapur News : दरोडेखोरांचा तासभर धुमाकुळ : पत्नीसह मुलाला दोरखंडाने बांधले, माजी सरपंचांच्या घरावरील दराेड्याचा थरार; कोल्हापूरहून श्वान पथक रवाना

या अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com