Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : बावड्यातील शेतकरीच बंटी पाटलांना त्यांची जागा दाखवतील : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील शिवपार्वती मंदिर परिसरात आज सभा झाली.
rajaram sahakari sakhar karkhana kolhapur, dhananjay mahadik, satej patil
rajaram sahakari sakhar karkhana kolhapur, dhananjay mahadik, satej patilsaam tv
Published On

Dhananjay Mahadik News : तुमच्या पॅनेलला माणसं मिळेनात अन् महाडिक भ्याले भ्यालेचा प्रचार करत सुटलाय. खरंतर तुमचे पाेट बिघडलं की तुम्ही जनतेतून पळत सुटता हे सर्वांना माहित आहे. माणसं मिळेनात म्हणून रात्रीत आपलीच दाेन माणसं यांनी पळवून नेली. जे गेले त्यांना अंगठी का अजून काय दिली काय माहित, तुम्हांला देखील गंडवतील पण तुम्ही सर्तक राहून कारखाना (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election) निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिकांच्या (mahadevrao mahadik) पाठीशी ठाम राहा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक उपस्थित सभासदांना केले. (Breaking Marathi News)

rajaram sahakari sakhar karkhana kolhapur, dhananjay mahadik, satej patil
Kolhapur News : दरोडेखोरांचा तासभर धुमाकुळ : पत्नीसह मुलाला दोरखंडाने बांधले, माजी सरपंचांच्या घरावरील दराेड्याचा थरार; कोल्हापूरहून श्वान पथक रवाना

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील महादेवराव महाडिक यांच्या छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी पॅनलचा प्रचाराचा आज प्रारंभ झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक बाेलत हाेते. व्यासपीठावर आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत.

rajaram sahakari sakhar karkhana kolhapur, dhananjay mahadik, satej patil
Nagar News : मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, रात्रीत घरं उभारली गेली (पाहा व्हिडिओ)

खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना बावड्यातील 90 टक्के शेतकरी ऊस कारखान्याला घालतात हे लक्षात असू द्या. शेतकरी सभासद आमच्याशी पाठीशी आहेत. त्यामुळे बावड्यातून देखील तुम्हांला मतदान हाेणार नाही असे आव्हान महाडिकांनी सतेज पाटलांना दिले.

एका गावात तीन तीन उमेदवार उभे करीत आहात. खरं तर सहकारी क्षेत्रातील निवडणुकीचा हा इतिहास म्हणावा लागेल अशी बाेचरी टीका महाडिक यांनी पाटलांवर केली. ते म्हणाले त्यांचे कुटुंब प्रचाराला फिरत आहे अर्थात त्यातील काही नाही म्हणा असे म्हणताच उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com