Mahavitran News : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना महिलांनी कार्यालयातच कोंडले

आक्रमक महिलांपुढे सगळेच कर्मचारी हतबल झाले.
beed, women protests at Mahavitran office
beed, women protests at Mahavitran officesaam tv

Beed News : गेल्या 4 दिवसांपासून गावात लाईट नाही. त्यामुळं मुबलक पाणी असताना देखील पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने तांबवा गावातील महिला संतापल्या. तसेच संतापाच्या भरात त्यांनी चक्क महावितरण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले आणि हातातील हंडे एकमेकांवर आदळून संताप व्यक्त केला. (Maharashtra News)

beed, women protests at Mahavitran office
Pune Bus Accident News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बस अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

बीडच्या केज तालुक्यातील तांबवा येथील महिला मागील तीन दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करत आहेत. मुबलक पाणी असताना देखील वेळेवर लाईट नसल्याने पाणी मिळत नाही. लाईट बिल वेळेवर भरून देखील लाईट नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गावातील महावितरणच्या कार्यालयावर जाऊन संताप व्यक्त केला.

beed, women protests at Mahavitran office
Buldana Urban News : ३. २६ कोटींचा अपहार, 'बुलडाणा अर्बन' च्या अधिका-याची पाेलिसांत धाव; व्यापा-यासह कर्मचा-यावर गुन्हा

विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्याला काही काळ कार्यालयातचं कोंडले होते. दरम्यान यावेळी महिलांनी (women) भांडे आपटून महावितरणच्या (mahavitran) ढिसाळ कारभारा विरोधात संताप व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com