Kothimbir , coriander price drop in maharashtra saam tv
ऍग्रो वन

Kothimbir Price Drop In Maharashtra: कोथिंबीर झाली उदंड, शेतक-यांना आर्थिक भुर्दंड; फिरवू लागलेत रोटाव्हेटर

कोथिंबीरला भाव मिळत नसल्याने व्यापारी कोथिंबीर खरेदी करण्यासाठी तयार नसल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यात आहे.

Siddharth Latkar

- संजय जाधव / बालाजी सुरवसे

Maharashtra News : राज्यभरात कोथिंबीरची (coriander) आवक वाढल्याने घाऊकसह किरकाेळ बाजार काेथिंबीराचा भाव ढासळू लागल्याने शेतक-यांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात उत्पादक शेतकरी कोथिंबीरच्या शेतावर रोटाव्हेटर फिरवू लागले आहेत. (Maharashtra News)

अतिशय मेहनत घेऊन बुलडाणा (buldhana) परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची लागवड केली होती. परंतु कोथिंबीरला भावच नसल्याने व व्यापारी खरेदीस येत नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

परिणामी 10 गावातील 15 भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीस आलेली कोथिंबीर शेतातच रोटाव्हेटर फिरवुन् नष्ट केली. धाड परिसरातील करडी, धामणगाव, धाड, मासरुळ, वरुड, सोयगाव, पागंरखेड, सावळी, कुंबेफळसह अनेक गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादक आहेत.

कमी पाण्यात उन्हाळ्यात अतिशय मेहनत घेऊन भाजीपाला लागवड करतात. कोथिंबीर खरेदी करण्यासाठी या ठिकाणी व्यापारी येत असतात हे व्यापारी त्यांचे मजूर आणुन कोथिंबीर घेवुन जात असतात. यावेळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेली कोथिंबीर घेण्यासाठी व्यापारी आलेच नाही.

कोथिंबीरला नागपुर, अकोला, वाशी येथे मागणी असते. भाव मिळत नसल्याने व्यापारी कोथिंबीर खरेदी करण्यासाठी तयार नाहीत. त्यातच स्थानिक बाजारात माती मोल भाव कोथिंबीरला भाव मिळत आहेत. तसेच शेतकरी यांना मजुर लावुन कोथिंबीर काढणे परवडत नसल्याने अनेकांनी आपल्या उभ्या मालामध्ये चक्क रोटाव्हेटर फिरवला.

धाराशिवला कोथिंबिरचा दर कोसळला

धाराशिव जिल्ह्यात महिन्याभरापुर्वी 800 ते 900 रुपये असलेला कोथिंबिरचा दर कोसळला असून सध्या कॅरेटला केवळ 50 ते 70 रुपये मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेत आहे.

धाराशिव जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस (rain) लांबला. यामुळे अगोदरच्या टप्प्यात सोयाबीन व अन्य खरीप पिकांऐवजी अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर पेरण्यावर भर दिला.जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याला चांगला दरही मिळाला.

कोथिंबिरचे एक कॅरेट शेतातून 800 ते 900 रुपयांना दिले परंतु त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर पेरण्यावरच भर दिल्यामुळे सातत्याने कोथिंबिरीची आवक वाढत गेली. मुंबई व नाशिक बाजारात परिसरातील कोथिंबीर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली होती. याच दरम्यान मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील कोथिंबिरची वाहने मुंबई शहरात जाऊ शकली नाहीत.

15 दिवसांपूर्वी 300 रुपये पर्यंतचा कॅरेटचा दर कोसळुन हा दर 50 रुपयांवर आला आहे. दरम्यान दर कोसळल्यामुळे शेतकरी (farmers) व व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT