BJP Pappu Chavan Case : माझे राजकीय अस्तित्व त्यांना खूपतयं... शिवसेना आमदाराने खूनाची सुपारी दिल्याचा आराेप, दाेघे अटकेत

या प्रकरणी अटक केलेल्यांची पार्श्वभूमी व अन्य माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर हे पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याची माहिती पाेलिस दलाने दिली.
mla santosh bangar, hingoli, bjp yuva morcha president pappu chavan
mla santosh bangar, hingoli, bjp yuva morcha president pappu chavansaam tv
Published On

Hingoli News : माझे राजकीय अस्तित्व वाढत असल्यानेच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (mla santosh bangar) यांच्यासह नगरसेवक राम कदम, शाम कदम यांच्याकडून माझ्या खुनाची सुपारी दिल्याचा आराेप भाजपचे पदाधिकारी पप्पू चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या गंभीर आरोपाचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहे. (Maharashtra News)

mla santosh bangar, hingoli, bjp yuva morcha president pappu chavan
Dr. Heena Gavit News : पंतप्रधान घरकुल योजनेतील 'त्या' लाभार्थींवर कारवाई हाेणार : खासदार डॉ. हिना गावित

हिंगोली येथे मंगळवारी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण (hingoli bjp yuva morcha president pappu chavan) यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी वेगवेगळ्या पथकाच्या मार्फत जलद गतीने तपास करून या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक केली.

mla santosh bangar, hingoli, bjp yuva morcha president pappu chavan
Congress आमदारासह 52 जणांवर गुन्हा दाखल, Sambhaji Bhide यांच्या अटकेसाठी छेडलं हाेतं आंदाेलन

पप्पू चव्हाण यांच्यावी हा हल्ला पूर्व वैमान्यासातून झाल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली. हिंगोली पोलीस या प्रकरणात (crime news) सहभागी असलेल्या इतर संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्यांची पार्श्वभूमी व अन्य माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर हे पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याची माहिती पाेलिस दलाने दिली.

mla santosh bangar, hingoli, bjp yuva morcha president pappu chavan
Sangli News : संभाजी भिडेंवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, सांगलीतून मागणी

दरम्यान या हल्ल्याबाबत भाजपचे पप्पू चव्हाण यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहे. चव्हाण यांनी या हल्ल्याप्रकरणी शिवसेना आमदार संतोष बांगर, नगरसेवक राम कदम, शाम कदम यांच्यावर ठपका ठेवला आहे.

त्यांच्या म्हणण्यानूसार माझी राजकीय वाटचाल यशस्वी हाेत असल्याने माझ्या खुनाची सुपारी या लाेकप्रतिनिधी यांनी दिली. या घटनेची सीआयडी चाैकशी व्हावी अशी मागणी पप्पू चव्हाण यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com