Dr. Heena Gavit News : पंतप्रधान घरकुल योजनेतील 'त्या' लाभार्थींवर कारवाई हाेणार : खासदार डॉ. हिना गावित

आगामी काळात बाेगस लाभार्थींवर कायदेशिर कारवाईचा इशारा डाॅ. गावित यांनी दिला आहे.
Dr. Heena Gavit, Nandurbar, Nandurbar News, Gharkul Yojana, pradhan mantri gharkul yojana
Dr. Heena Gavit, Nandurbar, Nandurbar News, Gharkul Yojana, pradhan mantri gharkul yojanasaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News : ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान घरकुल योजना (pradhan mantri gharkul yojana) सुरू केली आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने खासदार डाॅ. हिना गावित यांनी सखाेल चाैकशीची मागणी केली हाेती. आता चुकीचे काम करणा-या 350 लाभार्थी यांच्यावर कारवाई हाेणार असल्याची माहिती डाॅ. गावित यांनी दिली. (Maharashtra News)

Dr. Heena Gavit, Nandurbar, Nandurbar News, Gharkul Yojana, pradhan mantri gharkul yojana
Kolhapur News : पाणी आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या...., सुळकुड ग्रामस्थ घुसले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात, आजच महत्त्वपूर्ण बैठक

डाॅ. गावित म्हणाल्या 350 बोगस लाभार्थी या योजनेत आढळून आले आहेत. या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तर मूळ लाभार्थींना आता पंतप्रधान घरकुल योजना देण्यासाठी केंद्र सरकारकडे देखील मागणी करणार आहे.

Dr. Heena Gavit, Nandurbar, Nandurbar News, Gharkul Yojana, pradhan mantri gharkul yojana
Kamla Ekadashi 2023 : विठू नामाच्या गजराने पंढरी दुमदुमली, अडीच लाख भाविक दाखल; दर्शनासाठी लागताेय आठ तासांचा वेळ (पाहा व्हिडिओ)

नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यातील नवापूर अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात असा भ्रष्टाचार होणार नाही याकडे देखील लक्ष दिलं जाणार आहे असेही डाॅ. गावित यांनी स्पष्ट केले. यानंतर कोणीही बोगस लाभार्थी आढळल्यास त्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा खासदार डाॅ. हिना गावित यांनी चुकीचे काम करणा-यांना दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com