- अमर घटारे
Yashomati Thakur News : महापुरुषांबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (shiv pratishthan hindustan chief sambhaji bhide) यांची वक्तव्य याेग्य नाहीत. भिडे यांच्यावर झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी काॅंग्रेसच्या आमदार यशाेमती ठाकूर (mla Yashomati Thakur) यांनी (साेमवार) अमरावती येथे रास्ता राेकाे आंदाेलन केले हाेते. या प्रकरणी आमदार ठाकूर यांच्यासह 52 जणांवर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)
महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात आमदार यशाेमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदाेलन झाले. या आंदाेलनात माेठ्या संख्येेने काॅंग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
या आंदोलना दरम्यान जाेपर्यंत भिडे (sambhaji Bhide) यांना अटक हाेत नाही ताेपर्यंत आम्ही उठणार नाही असे म्हणत आमदार ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते यांनी रास्ता राेकाे केला. हा रास्ता राेकाे आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर केला.
या आंदाेलनाप्रकरणी आज (मंगळवार) आमदार यशाेमती ठाकूर यांच्यासह 52 जणांवर पाेलिसांनी गुन्हा केला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.