Karad News : मनोहर कुलकर्णी हा सिरियल ऑफेन्सर आहे. जी संघटना ते चालवितात त्याला पैसा काेठून येताे. काेण देते संघटनेला पैसा असे प्रश्न काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (congress leader prithviraj chavan) यांनी मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) (sambhaji bhide) आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (shiv pratishthan hindustan) या विषयी उपस्थित केले आहेत. आमदार चव्हाण हे क-हाड (karad) येथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)
महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आराेप करीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात संभाजी भिडे यांना अटक करावी अशी मागणी केली. त्यानंतर रविवारी आमदार चव्हाण यांना धमकी देण्याचा प्रकार घडला.
आज (साेमवार) आमदार चव्हाण यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले गांधी खूनाच्यावेळी सरदार वल्लभाई पटेल यांनी दुसऱ्या दिवाशी आरएसएसवर का बंदी आणली. त्यांचे काय विचार होते. का बंदी घातली याबाबतचे त्यांचे पत्रा वाचले का ? त्यामुळे आमचा संबध नाही असे म्हंटले तर कोणी विश्वास ठेवेल का ? असा चिमटा चव्हाणांनी भाजपसह आरएसएसला काढला आहे.
महात्मा गांधींबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आमदार चव्हाण म्हणाले संभाजी भिडे यांनी कायदा मोडाला की नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पाहिजेत आणि कारवाई झाली पाहिजेत. अन्यथा त्यांनी सांगावे कायदा मोडला नाही. ते संत आहेत.
तेलात कोणी काडी टाकणार असेल तर गप्प बसायचे का ? हा (संभाजी भिडे) देश पेटवायला निघाला आहे. मग आम्ही काय स्वस्त बसायचे का ? असा सवालही आमदार चव्हाण यांनी राज्य सरकारला केला आहे.
कुलकर्णींनी (भिडे) त्यांचे नाव का बदलले ? एखादा माणूस वेगळ्या नावाने काहीतरी करतो, एखाद्या समाजाला आकर्षित करण्याकरता नाव बदलून फसवणूक चालले आहे हे सहन केले जाणार नाही असेही आमदार चव्हाण यांनी म्हटलं.
लाेकमान्य टिळक महानच पण...
दरम्यान एखाद्या खाजगी संस्थेचा पुरस्कार पंतप्रधान असलेल्या पदावरच्या व्यक्तीने घेणे योग्य आहे का? लोकमान्य टिळक हे महानच होते असे सांगत आमदार चव्हाण यांनी उद्या पुण्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र माेदी हे लाेकमान्य टिळक स्मृती पुरस्कार स्विकारण्यास येत आहेत त्यावर आक्षेप नाेंदविला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.