Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

sayaji shinde news : त्यादिवशी पाऊस राहिल्यास कार्यक्रमाच्या ठिकाणांत बदल केला जाईल असेही अभिनेते शिंदे यांनी नमूद केले.
Dr. A. H. Salunkhe, Sayaji Shinde
Dr. A. H. Salunkhe, Sayaji Shindesaam tv
Published On

Satara News : सहयाद्री देवराई परिवार यांच्यावतीने ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डाॅ. आ.ह. साळुंखे (Dr. A.H. Saunkhe) यांच्या 80 व्या वर्षपूर्ती निमित्त 12 ऑगस्टला डाॅ. साळुंखे यांची बीजतुला करण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती सहयाद्री देवराईचे अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Maharashtra News)

Dr. A. H. Salunkhe, Sayaji Shinde
Kolhapur Rain : फुलेवाडी गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरू, शाळांच्या सुट्ट्यांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती (पाहा व्हिडिओ)

सयाजी शिंदे (sayaji shinde) म्हणाले डाॅ. आ.ह.साळुंखे यांनी मराठी विश्वकाेशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत आदी विषयात 100 हून अधिक लेख लिहिले आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यातून माेठा सामाजिक क्रांती घडलेली आहे.

Dr. A. H. Salunkhe, Sayaji Shinde
Samruddhi Mahamarg News : डाॅ. दाभाेलकरांच्या मागणीनंतर स्वामी समर्थ भक्तावर गुन्हा दाखल, समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाही केला हाेता दावा (पाहा व्हिडिओ)

सयाजी शिंदे म्हणाले डाॅ. आ. ह. साळुंखे हे मराठीतील लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांच्या व्याख्यानातून व लेखणातून अनेक लाेक वैचारीकदृष्टया समृद्ध झाले आहेत व यापुढेही समृद्ध हाेणार आहेत.

त्यांच्या कार्याचा गाैरव सहयाद्री देवराई 12 ऑगस्टला बीजतुला करुन करणार आहे. या उपक्रमात दिग्दर्शक नागराज मंजुळे, संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला करण्यात येईल. हा उपक्रम पुणे बंगळूर महामार्गावरील (pune bangalore highway) डी-मार्ट नजीकच्या सह्याद्री देवराई (satara) येथे सकाळी 11 ते दाेन या कालावधीत हाेईल. दरम्यान त्यादिवशी पाऊस राहिल्यास कार्यक्रमाच्या ठिकाणांत बदल केला जाईल असे शिंदे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com