Sangli, telangana cm kcr
Sangli, telangana cm kcrsaam tv

Telangana CM KCR To Visit Sangli : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज महाराष्ट्रात, 'या' नेत्याची घेणार भेट; वाटेगावातील सभेत केसीआर काय बाेलणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष

मुख्यमंत्री केसीआर हे कोल्हापूरात विमानाने दाखल होतील. त्यानंतर वाहनाने ते वाटेगाव येथे जाणार आहेत.

- विजय पाटील / रणजीत माजगावकर

Sangli News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती (annabhau sathe jayanti) निमित्ताने तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) आज (मंगळवार) सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे येणार आहेत. मुख्यमंत्री राव हे आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करणार आहेत. (Maharashtra News)

Sangli, telangana cm kcr
Prithviraj Chavan News : महात्मा गांधींचा खून कोणी केला? साेयीनूसार आजही RSS वर हात करत आहे : पृथ्वीराज चव्हाण

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १०३ व्या जयंती आहे. या निमित्ताने तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचे (बी.आर.एस.) के.चंद्रशेखर हे अण्णभाऊ साठे यांना अभिवादन केल्यानंतर वाटेगाव (wategaon sangli) येथे सभेला संबाेधित करणार आहेत. त्यासाठी भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे.

Sangli, telangana cm kcr
Support To Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ काेल्हापूरसह साता-यात हजाराे युवक उतरले रस्त्यावर

अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीमाई साठे, नातू सचिन साठे व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येईल. के चंद्रशेखर पंढरपूर नंतर पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे येत आहेत. पंढरपूरात त्यांनी केलेल्या विधानावर संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नेत्यांनी आपली मते मांडली होती. आज पुन्हा के. चंद्रशेखर राव काय बाेलणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान या दाै-यात मुख्यमंत्री राव हे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील (raghunath dada patil) यांच्या साखराळे येथील निवासस्थानी भेट देणार आहेत.

Sangli, telangana cm kcr
Social Media त लाईव्ह करुन दांपत्याने उचललं टाेकाचे पाऊल, तहसीलदारांनी फेटाळले त्यांच्यावरील आराेप

असा असेल दाैरा

मुख्यमंत्री केसीआर हे कोल्हापूरात विमानाने दाखल होतील. सकाळी साडेअकरा वाजता के सी आर हे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते सांगली जिल्ह्यातल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. वाहनाने ते वाटेगाव येथे जाणार आहेत. दुपारी पुन्हा ते कोल्हापुरात येतील. सायंकाळी चार वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com