Social Media त लाईव्ह करुन दांपत्याने उचललं टाेकाचे पाऊल, तहसीलदारांनी फेटाळले त्यांच्यावरील आराेप

दाेघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
sangli , Crime News
sangli , Crime NewsSaam TV
Published On

Sangli News : सांगली जिल्ह्यातील विटा शहरात एका दांपत्याने समाज माध्यमातून लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रस्ता मिळत नसल्याने पती-पत्नीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. या दाेघांवर विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

sangli , Crime News
Prithviraj Chavan News : महात्मा गांधींचा खून कोणी केला? साेयीनूसार आजही RSS वर हात करत आहे : पृथ्वीराज चव्हाण

या दाेघांनी आपल्या घराकडे आणि शेताकडे जाणा-या रोडला परवानगी मिळत नसल्याच्या कारणातून या दांपत्याने आत्महत्याचा प्रयत्न केल्याचं समोर आले असले तरी प्रशासकीय अधिकारी यांनी संबंधित विषय हा तहसीलदाराच्या अखात्यारीतला विषय नाही असे साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

sangli , Crime News
Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंचे माैन, खामगावात आज सभा; काॅंग्रेस, एनसीपीसह वंचितच्या हालचालींवर पाेलिसांचे लक्ष

सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते. या दांपत्याने एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी तहसीलदाराकडून आपले काम होत नसल्याचा आरोप केला आहे.

याबाबत विटा तहसीलदारांशी संपर्क साधला असता संबंधित व्यक्ती घरासाठी रस्ता मागत होता. पण तो रस्ता देणं हा तहसीलदाराच्या अखात्यारीतला विषय नाही आणि याबाबतचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला होता असं फोनवरुन म्हंटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com