Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंचे माैन, खामगावात आज सभा; काॅंग्रेस, एनसीपीसह वंचितच्या हालचालींवर पाेलिसांचे लक्ष

Sambhaji Bhide Controversial Statement On Mahatma Gandhi : आज खामगाव येथे संभाजी भिडेंची सभा आहे.
Sambhaji Bhide News, buldhana
Sambhaji Bhide News, buldhanasaam tv
Published On

Buldhana News : नेहमी वेगवेगळ्या वक्तव्यांनी वादग्रस्त राहिलेले व भीमा कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या विषयी एक वक्तव्य केले. त्यावरुन काँग्रेसने भिंडेंच्या विरोधात राज्यभरात निदर्शन केली. दरम्यान भिडेंना अटक हाेत नाही पर्यंत काँग्रेस आक्रमक पवित्र्यातच राहणार असं चिन्ह आजही आहे. (Maharashtra News)

Sambhaji Bhide News, buldhana
Milk Price : काय सांगता ! म्हशीच्या दूधाला मिळाला 98 रुपये दर, शेतकरी कुटुंब आनंदित

संभाजी भिडे हे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना त्यांना काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व माळी महासंघाच्या वतीने ठिकठिकाणी विरोध होताना दिसले. नागपूर, यवतमाळ, अमरावती, वाशीम, अकोला व आता बुलडाणा असे सहा जिल्ह्यात संभाजी भिडे यांनी दौरा केला.

आज विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे त्यांची सायंकाळी विदर्भ दाै-यातील शेवटची सभा होणार आहे. ही सभा उधळून लावण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. त्यामुळे आज सायंकाळी हाेणा-या पाचच्या सभेकडे जिल्हावासियांचे लभ लागून राहिले आहे.

Sambhaji Bhide News, buldhana
Maratha Samaj Morcha : 15 गावांत कडकडीत बंद... शेकडाे कार्यकर्त्यांसह मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

दरम्यान संभाजी भिडे यांचे आज (साेमवार) सकाळी बुलडाणा जिल्ह्यात पोलिस संरक्षणात प्रवेश झाला. भिडे हे शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात आले हाेते. त्यांनी संत गजानन महाराज समाधीचे यांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त हाेता.

संभाजी भिडे यांनी मौन व्रत धारण केले हाेते. श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतल्यावर ते मौन व्रत सोडणार असे धारक-यांनी सांगितले. दरम्यान भिडे हे दर्शनानंतर खामगावला रवाना झाले.

Sambhaji Bhide News, buldhana
Hingoli Crime News : आर्थिक घाेटाळ्याप्रकरणी बुलढाणा अर्बनच्या शाखा व्यवस्थापकांसह 5 कर्मचा-यांवर कळमनुरीत गुन्हा दाखल

दूसरीकडे खामगावात संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव माधव पाटील यांच्यासह दोन-तीन कार्यकर्त्यांना खामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com