Maratha Samaj Morcha : 15 गावांत कडकडीत बंद... शेकडाे कार्यकर्त्यांसह मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Sangli News : गुन्हा मागे न घेतल्यास तीव्र आंदाेलन छेडण्याचा समाजाने दिला इशारा.
sangli, Maratha Samaj Morcha
sangli, Maratha Samaj Morchasaam tv
Published On

Sangli News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान पाडल्या प्रकरणी दाखल झालेले ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आज (साेमवार) सांगली जिल्ह्यातील पंधरा गावांनी बंद पाळला. तसेच मागण्यांच्या पुर्तेतेसाठी मराठा समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. (Maharashtra News)

sangli, Maratha Samaj Morcha
Koyna Dam Water Level : कोयना धरण व्यवस्थापनाचा नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा, आज दुपारी चार वाजता...

सांगलीच्या (sangli) बेडगे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान पाडल्या प्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निषेधार्थ बेडगसह मिरज तालुक्यातल्या अनेक गावांनी आज कडकडीत बंद पाळला. त्यानंतर मराठा समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

sangli, Maratha Samaj Morcha
Satara Waterfalls : सातारा जिल्ह्यात 'या' धबधब्यांवर जाण्यास बंदी; पर्यटकांची घाेर निराशा

मिरज तालुक्यातील बेडग मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान पाडकाम प्रकरणाचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. कमान पाडल्या प्रकरणी गाव सोडून निघालेल्या दलित बांधवांच्या लॉंग मार्चनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सरपंच उपसरपंचांसह तिघांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

sangli, Maratha Samaj Morcha
Vadar Samaj Morcha : सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ

दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत गाव बंद ठेवण्यात (aandolan) येतील तसेच आंदाेलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा मराठा समाजासह (maratha community) अमरसिंह पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य ,आरग, सांगली) यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com