Koyna Dam Water Level : कोयना धरण व्यवस्थापनाचा नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा, आज दुपारी चार वाजता...

Satara Rain Update : सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 72.19 अब्ज घन फूट पाणी साठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 48.49 टक्के इतका असल्याचे कृष्णा सिंचन विभागाने कळविले आहे.
satara, rain, koyna dam
satara, rain, koyna damsaam tv

Koyna Dam News : सातारा (satara) जिल्ह्यात विशेषत: काेयना भागात पावसाचा जाेर आहे. या भागात पडत असलेल्या पावसामुळे काेयना धरण व्यवस्थापनाने आज (साेमवार, ता. 24 जूलै) दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या विद्युतगृहातून1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे नियाेजन केले आहे. तरी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (Maharashtra News)

satara, rain, koyna dam
Kolhapur Landslide Survey : जीव गेला तर बेहत्तर...घर साेडणार नाही, कोल्हापूरातील दरड प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ 'या' भूमिकेवर ठाम

कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 150 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 107 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम – 18 मिली मीटर, धोम – बलकवडी – 94, कण्हेर – 27, उरमोडी – 41, तारळी – 56, येरळवाडी – 3, उत्तरमांड – 40, महू – 52, हातगेघर – 52, वांग (मराठवाडी) – 35, नागेवाडी-19 मिली मीटर पाऊस झाला आहे. नेर, राणंद, आंधळी धरणाच्या क्षेत्रातील कालचा पाऊस निरंक आहे असे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.

satara, rain, koyna dam
Warna River Flooded : शिराळ्यात धुव्वाधार पाऊस, वारणा नदीवरील मांगले सावर्डे पूल पाण्याखाली

दरम्यान कोयना धरणाच्या (koyna dam) पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. धरणामध्ये आवक वाढली असून 51.93 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून आज (24 जुलै) दुपारी चार वाजता 1050 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.

तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ग्रामस्थांनी नदी पात्रात जावू नये. तसेच त्यांनी जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com