Pandharpur News : दूधाला दर मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झालेले असतानाच दुसरीकडे पंढरपूर तालुक्यानजीकच्या मोडनिंब येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीच्या एक लिटर दूधाला तब्बल 98 रूपये 59 पैसे इतका उच्चांकी दर मिळाला आहे. आनंदित झालेल्या शेतक-याने म्हशीला सजवून काैतुक केले. (Maharashtra News)
राज्यभरातील शेतकरी दूधाला दर मिळावा यासाठी सातत्याने आंदाेलन छेडत असतात. राज्य सरकाराने शेतक-यांच्या व्यथा समजून दूधाला दर दिला जाईल असे आश्वासित केले हाेते. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूधाचा दर निश्चित केला. त्यामुळे शेतक-यांचे आंदाेलन (aandolan) काही काळ का हाेईना शमले.
दरम्यान पंढरपूर जवळच्या मोडनिंब (modnimb) येथील शेतकरी स्वप्नील शिंदे यांना म्हशीच्या एक लिटर दूधाला तब्बल 98 रूपये 59 पैसे इतका उच्चांकी दर मिळाला आहे. हा दर मोडनिंब मधील अमुलच्या दुध संकलन केंद्रात मिळाला आहे.
यामुळे आनंदित झालेल्य़ा शेतक-याने (farmer) म्हशीला रंगवुन, शिंगावर फुगे लावुन तिला पेढे भरवुन तिचे काैतुक केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.