Nandurbar Condemns Manipur Incident : शहादात समाजकंटकांची बसवर दगडफेक, नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद

Nandurbar Bandh News : शहरातील चाैका-चाैकांत पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे.
Nandurbar Bandh, Manipur Incident
Nandurbar Bandh, Manipur Incidentsaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा बंदला आज (बुधवार) शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान शहादा मधील एसटी वरील दगडफेक वगळता सर्वत्र शांततेत बंद आहे. कायदा व सुवव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्ह्यात पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त आहे. (Maharashtra News)

Nandurbar Bandh, Manipur Incident
Satara Rain Update : साता-यात पावसाची संततधार, पाटणला दरड काेसळली; उद्या रेड अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

मणिपूर (manipur incident) येेथे आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील 17 आदिवासी संघटनांनी एकत्र येत नंदुरबार जिल्हा बंदची हाक दिली हाेती. त्यानूसार आज (बुधवार) नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

Nandurbar Bandh, Manipur Incident
Gadchiroli News : नक्षलवाद्यांनी कुरापत काढली तर..., असा असेल पाेलिसांचा प्लॅन (पाहा व्हिडीओ)

दरम्यान शहादा येथे एसटीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यामुळे एकच खळबळ उडाली. परिणामी शहादा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. आजच्या बंदमुळे बाजार समिती ही बंद ठेवण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती चिघळू नये यासाठी पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com