IPS Sandip Patil News : महाराष्ट्राच्या सीमेवर रांजदानगाव, कवर्धा, बालाघाट परिसरात नक्षलवादी ॲक्टीव झाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली आहे. यामुळे पाेलिस प्रशासनासमाेर नवीन चॅलेंज उभे ठाकलं आहे. दरम्यान नक्षलवादी चळवळ आम्ही माेडीत काढू असा विश्वास संदीप पाटील (डीआयजी, नागपूर गडचिरोली परिक्षेत्र) यांनी साम टीव्हीशी बाेलना नमूद केले. (Maharashtra News)
नक्षलवाद्यांनी (naxals) पुन्हा एकदा एक नवा वॅार झोन तयार करीत आहेत. केंद्रीय सुरक्षा दलांच्या कारवाईच्या भितीनं दंडकारण्याशिवाय नक्षलवाद्यांना नवा वॅार झोन हाेत आहे. २८ जुलै ते ३ ॲागस्ट नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या प्रसिद्धीपत्रकात नव्या वॅारझोनची कबुली देण्यात आली.
नवं चॅलेंज
नक्षलवादी छत्रीसगडमध्ये नवी भरती करुन वॅारझोनमध्ये तुकड्या सज्ज होत आहेत. महाराष्ट्रासह तीन राज्यातील पोलीसांसमोरचं नवं चॅलेंज असले तरी १००० सशस्त्र नक्षलवाद्यांची बटालीयन आणि प्रत्येकी २५० नक्षलवाद्यांच्या चार तुकड्या करुन जंगलात फिरणा-या नक्षलवाद्यांचा आम्ही जरुर मुकाबला करु असे संदीप पाटील यांनी नमूद केले.
चाेख प्रत्युत्तर देऊ
नक्षली घटना फार कमी झाल्या आहेत. गडचिराेलीत देखील घटनांचे प्रमाण फार कमी आहे. त्यांनी काही कूरापती काढण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला चाेख प्रतिउत्तर देऊ असा विश्वास संदीप पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.
दरम्यान मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. त्यावर देखील संदीप पाटील यांनी त्यांची सुरक्षा कडक असते, चिंतेचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.