Maharashtra Electricity Rate: अन्य राज्यांत वीजदर कमी, महाराष्ट्रातील वाढीव वीजदराची चाैकशी करा; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Rising Electricity Rate in Maharashtra: या याचिकेवर पुढील सुनावणी आता 17 ऑगस्टला होणार आहे.
Maharashtra Electricity Rate News
Maharashtra Electricity Rate Newssaam tv
Published On

- नवनीत तापडिया

Case on Rising Electricity Rate in Maharashtra:

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर अधिक असल्यासह इतर गैरप्रकारांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी अशी जनहित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय. बी खोब्रागडे यांनी प्रतिवादींना नोटीस बजावल्या आहेत. (Maharashtra News)

Maharashtra Electricity Rate News
Samruddhi Mahamarg News : डाॅ. दाभाेलकरांच्या मागणीनंतर स्वामी समर्थ भक्तावर गुन्हा दाखल, समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाही केला हाेता दावा (पाहा व्हिडिओ)

खंडपीठाने प्रतिवादी एमएसईबीच्या होल्डिंग कंपनीचे अध्यक्ष तथा ऊर्जामंत्री यांच्यासह राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, वीज नियामक आयोगाचे सचिव, महावितरणाचे (mahavitran) संचालक आणि महावितरणच्या अध्यक्षासह व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावून 7 ऑगस्टपर्यंत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Electricity Rate News
Pregnant Women Story : गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून न्यावे लागले नदीतून खांद्यावर; हे पाहून शिंदे फडणवीस सरकारला पाझर फुटणार का? (पाहा व्हिडिओ)

ऊर्जा क्षेत्रातील अभ्यासक, अभियंता अजित देशपांडे यांनी ही जनहित याचिका वीकल गिरीश नाईक-थिगळे यांच्यामार्फत दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी आता 17 ऑगस्टला होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com