Pregnant Women Story : गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून न्यावे लागले नदीतून खांद्यावर; हे पाहून शिंदे फडणवीस सरकारला पाझर फुटणार का? (पाहा व्हिडिओ)

Palghar News Mokhada Maharashtra : आज दुपारच्या सुमारास महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
Palghar News, Mokhada
Palghar News, Mokhadasaam tv

- फय्याज शेख

Palghar News : स्वातंत्र्य हाेऊन 75 वर्ष झाली परंतु आजपर्यंत आम्हांला अद्याप काेणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. सरकारने आम्हांला मूलभूत सुविधा द्याव्यात तसेच पूलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेंडेपाडासह अन्य पाड्यातील ग्रामस्थ करु लागले आहेत. (Maharashtra News)

Palghar News, Mokhada
Samruddhi Mahamarg News : डाॅ. दाभाेलकरांच्या मागणीनंतर स्वामी समर्थ भक्तावर गुन्हा दाखल, समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाही केला हाेता दावा (पाहा व्हिडिओ)

पालघर (palghar) जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंडेपाडा येथील गरोदर महिला सुरेखा लहू भागडे या सात महिन्याची गरोदर आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तिला मोखाडा तालुक्यातील नांदगाव येथील रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी आज ग्रामस्थांना माेठी शिकस्त करावी लागली.

Palghar News, Mokhada
ST Driver Courage : एसटी चालकाचे धाडस पाहून प्रवाशांचे डाेळे पाणावले, 37 जणांचा जीव वाचला

या परिसरात रस्ता नसल्याने महिलेला नदीच्या पात्रातून डोलीच्या सहाय्याने ग्रामस्थांना नदी पार करावी लागली. पावसाळ्यामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा जाेर हाेता. त्यामुळे ग्रामस्थांनी माेठ्या हिम्मतीने नदी पार केली. आज दुपारच्या सुमारास महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Palghar News, Mokhada
Kalyan News : कल्याण स्टेशननजीक पाच बांग्लादेशी महिलांसह आश्रयदात्यांना अटक

गरदाेर मातेसह ग्रामस्थांची पूलाची मागणी

सुरेखा लहू भागडे म्हणाल्या आज सकाळपासून मला उलट्या होण्यास सुरुवात झाली होती. त्यासाठी नांदगाव रूग्णालयात जायचे हाेते परंतु रस्ता व पुल नसल्याने ग्रामस्थ नदीतून घेऊन जाणार आहेत. आमच्या पाड्यानजीकच्या नदीत सरकारने पूल बांधला पाहिजे.

स्वातंत्र्यानंतरही ससेहाेलपट सुरु

उपसरपंच मोहन मोडक म्हणाले गावातील गराेदर महिलेची (women) तब्येत बिघडली. तिला दवाखान्यात नेण्यासाठी झाेळी करुन नदीच्या पलीकडे नेले. आमच्या पाड्यात डाॅक्टर येत नाहीत, शिक्षणाची साेय नाही. स्वातंत्र्य हाेऊन 75 वर्ष झाली परंतु आजपर्यंत आम्हांला काेणतीही मूलभूत सुविधा नाही. सरकारने आम्हांला मूलभूत सुविधा द्याव्यात तसेच पूलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी असल्याचे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com