Pune Rickshaw Driver : रिक्षा चालकांचा प्रामाणिकपणा, सात ताेळे साेन्याचे दागिन्यांसह चांदीचे अलंकाराची बॅग केली परत

आजच्या युगात माणूसकी बघायला फार कमी दिसून येते असे म्हणत बारणे कुटुंबियांनी आणि पाेलिसांनी रिक्षाचालकांचा सन्मान केला.
maval news
maval newssaam tv
Published On

Maval News : मावळातील देहूरोड येथे एका रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षात विसरलेली लाखाे रुपयांची किंमतीचे साेन्याचे आणि चांदीचे दागिने कुटुंबास परत केले. रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचा देहूराेड पाेलिसांनी सन्मान केला. (Maharashtra News)

maval news
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

रिक्षा चालक गणेश फुरडे आणि सुरज तांबे यांना देहूरोड मुकाई चौक येथे एक पांढऱ्या रंगाची बॅग आढळली. त्यांनी बॅग पाहिल्यानंतर ती स्वत:कडे घेतली. त्यामध्ये पाहिल्यानंतर त्यांना बॅंगेत सोन्याचे दागिने व चांदीचे अलंकार दिसले.

maval news
Pavsali Adhiveshan 2023: तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर नाक्यांवर स्थानिकांना टाेल माफी का नाही? शिवेंद्रराजेंनी खडसावले (पाहा व्हिडिओ)

त्यांनी तडक दागिने असलेली बॅग घेऊन देहूरोड पोलिस ठाणे गाठले. दागिन्यांची बॅग सापडल्याचे सांगून देहूरोड पोलिसांना सुपूर्त केली. पाेलिसांनी या बॅंगेची तपासणी केली असताना त्यांना सोनाराची पावती आढळली. त्यानूसार पाेलिसांनी त्या पावतीवरील क्रमांकावरुन संपर्क साधला. त्यानंतर दागिन्यांची बॅग अर्चना बारणे यांची असल्याचे समजले.

maval news
World Archery Championships 2023: साता-याच्या आदिती स्वामीने रचला इतिहास, जागतिक तिरंदाजीत 'सुवर्ण'; ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू (पाहा व्हिडिओ)

पाेलिसांनी बारणे यांच्याशी संपर्क साधला. त्या पाेलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांना दागिन्यांची बॅग देण्यात आली. या बॅगेत सात ताेळे साेने हाेते. काही किलाे चांदी देखील हाेती. बारणे यांनी रिक्षा चालक गणेश फुरडे आणि सुरज तांबे यांच्यासह देहूराेड पाेलिसांचे आभार मानले.

आजच्या युगात माणूसकी, प्रामाणिकपणा (honesty) बघायला फार कमी दिसून येते असे म्हणत बारणे कुटुंबियांनी आणि पाेलिसांनी रिक्षाचालकांचा सन्मान केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com