Berlin : भारताच्या १७ वर्षीय आदिती स्वामी (india's archer aditi swami) हिने आज (शनिवार) जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकाविले. शिवछत्रपतींच्या राजधानी असलेल्या साता-याच्या आदितीने मिळविलेले हे यश देशाच्या इतिहासातील सर्वांत माेठी कामगिरी ठरली आहे. (Maharashtra News)
आदिती हिने ज्युनियर जगज्जेतेपद पटकावल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आज बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या कंपाऊंड महिलांच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला पराभूत करून विश्वविजेतेपद मिळविले.
अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेक्वेरा हिचा आदितीने (१४९-१४७) असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. बेकेरा दोन वेळा जगज्जेता राहिली आहे. 17 वर्षीय आदिती स्वामी ही वैयक्तिक स्पर्धेत जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे.
आदितीने उपांत्य फेरीत भारताच्या अनुभवी ज्योती वेन्नमचा (१४९-१४५) असा पराभव केला हाेता. तिच्या आजच्या यशानंतर देशासह साता-यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.
भारतीय संघाने नुकतेच पहिल्यांदाच कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. त्यापाठाेपाठ आदिती स्वामीच्या यशामुळे देशाच्या पदक तक्त्यास चार चाॅंद लागले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.