Pavsali Adhiveshan 2023: तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर नाक्यांवर स्थानिकांना टाेल माफी का नाही? शिवेंद्रराजेंनी खडसावले (पाहा व्हिडिओ)

Shivendraraje Bhosale News : गुंड प्रवृत्तीच्या लाेकांचे टाेल नाक्यावर काय काम? असाही सवाल शिवेंद्रराजेंनी केला.
Pavsali Adhiveshan 2023 , Satara, Shivendraraje Bhosale, Toll Plaza
Pavsali Adhiveshan 2023 , Satara, Shivendraraje Bhosale, Toll Plazasaam tv
Published On

Maharashtra Pavsali Adhiveshan 2023 : गुंड प्रवृत्ती असलेल्या लाेकांच्या ताब्यात टाेल नाके आहेत. केवळ कंपन्यांच्या नावावर टाेल नाका घेऊन टाेल वसूली गुंडांच्या माध्यमातून केली जाते. पाेलिसांच्या रेकाॅर्डवरील अनेक जण टाेल नाक्यावर कार्यरत असतात. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लाेकांवर आळा बसावा यासाठी टाेल कर्मचा-यांची चाैकशी करुन याेग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (mla shivendraraje bhosale) यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत केली. (Maharashtra News)

Pavsali Adhiveshan 2023 , Satara, Shivendraraje Bhosale, Toll Plaza
Arrest Sambhaji Bhide : अटक करा... अटक करा... संभाजी भिडेंना सात दिवसांत अटक करा...

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले म्हणाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) टाेल नाक्यांवर काेणत्याही सुविधा प्रवाशांना दिल्या जात नाहीत. गर्दीच्या वेळेस वाहनांसाठी टाेल नाका व्यवस्थापन त्यांच्या हितासाठी एक लेन आरक्षित ठेवतात.

त्या लेनच्या माध्यमातून मिळणारा पैसा हा रेकाॅर्डवर येत नाही. त्यामुळे एनएचआयचे रस्ते आहेत हे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेचा पैसा लुटला जात आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही राजेंनी नमूद केले.

Pavsali Adhiveshan 2023 , Satara, Shivendraraje Bhosale, Toll Plaza
Udayanraje Bhosale News : सरकारचे अभिनंदन करत उदयनराजेंनी पुन्हा त्यांची तीच मागणी लावून धरली...

स्थानिकांना टाेल माफी द्यावी

टाेल नाका परिसरातील ठराविक अंतरातील स्थानिकांना टाेल माफी दिली गेली आहे परंतु त्याची अंमलबजावणी एनएचआयकडून केली जात नाही. सातारा जिल्ह्यातील तासवडे, आनेवाडी तसेच पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टाेल नाका येथे स्थानिकांना टाेल माफी दिली गेली नाही असे शिवेंद्रराजेंनी म्हटलं.

गुन्हेगारांवर कारवाई केली जाते

शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रश्नांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी उत्तर देताना टाेल नाक्यांवर किती पैसे गाेळा केला जातात याची माहिती पटलावर ठेवली जाईल असे चव्हाण यांनी सभागृहास आश्वासित केले. तसेच गुन्हे दाखल असलेल्या लाेकांवर त्या त्या वेळी पाेलिस कारवाई करीत असतात असेही मंत्री चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com