Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

Crop Loan: रब्बी हंगामासाठी ७१ कोटींचे पीक कर्ज वाटप; उद्दिष्टापेक्षा कमीच वाटप

Beed News : खरीप व रब्बी पिकांसाठी कर्ज प्रतिकृती खरीप रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून दिले जाते

विनोद जिरे

बीड : शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीककर्ज वाटप करण्यात येत असते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी खर्च करता येत असतो. त्यानुसार (Beed) बीड जिल्ह्याकरीता रब्बी हंगामासाठी ७०० कोटी रुपयांचे (Crop Loan) कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यातील ७१ कोटी वाटप झाले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हे वाटप कमी झाले आहे. (Breaking Marathi News)

पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना ते बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासते. (Farmer) शेतकऱ्याला सावकाराकडे जाण्याची गरज पडायल नको; यासाठी खरीप व रब्बी पिकांसाठी कर्ज प्रतिकृती खरीप रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून दिले जाते. त्यानुसार बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात ७०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

७ हजार ३६४ शेतकऱ्यांना दिले कर्ज 

बीड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कर्ज वाटपास सुरवात झाली आहे. यात ७ हजार ३६४ शेतकऱ्यांना ७१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत १० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. पुरेसा पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन बदलले असून पीक कर्ज घेण्याकडे सध्या तरी कल दिसत नाही. येत्या काही दिवसात पाऊस झाल्यास आशा पल्लवीत होऊन पीक कर्ज मागणीला गती येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT