Shreya Maskar
पावसाळ्यात वीकेंडला मित्रांसोबत ट्रिप प्लान करत असाल तर भिवगड किल्ला हे बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता.
रायगड जिल्ह्यातील कर्जत भागात भिवगड किल्ला वसलेला आहे. भिवगड किल्ला हा पावसाळ्यातील सोप्या ट्रेकसाठी , हंगामी धबधब्यांसाठी आणि प्राचीन काळी टेहळणीची जागा (वॉचटावर) म्हणून प्रसिद्ध आहे.
येथील खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहन काळातील असावा असा अंदाज वर्तवला जातो. तसेच, १६ व्या-१७ व्या शतकात याचा वापर टेहळणीची जागा म्हणून केला जात असावा.
भिवगड किल्ल्यावरून आसपासच्या हिरव्यागार दऱ्या, भाताची शेते आणि 'ढक बहिरी' किल्ल्याकडे जाणारा मार्गाचे विहंगम दृश्य दिसते. समुद्रसपाटीपासून ८५० फूट उंचीवर खडकात कोरलेली प्राचीन पाण्याची टाके, लहान गुहा आणि किल्ल्याचे जुने अवशेष येथे पाहायला मिळतात.
कर्जत रेल्वे स्थानकापासून साधारण ७ किलोमीटर अंतरावर असलेली 'वडप' आणि 'गौरकामट' ही या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली मुख्य गावे आहेत. कर्जत स्टेशनला आल्यावर रिक्षाने या गावी पोहचा आणि तेथून किल्ल्यावर ट्रेकने जा.
भिवगड किल्ल्याचा आकार अरुंद आणि लांबट असून तो उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेला आहे.भिवगड किल्ला हा सामान्यतः भीमगड किंवा भिवगड या नावानेही ओळखला जातो.
भिवपुरी धबधबा, लेणी, कोथळीगड (पेठ) किल्ला, उल्हास व्हॅली, आणि पाली भुतिवली धरण अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.