Viral Video : 'मोहब्बतें'नं ओलांडली सीमा...चिनी सैनिकानं गायलं शाहरूखचं रोमँटिक गाणं; व्हिडिओ व्हायरल

India - China Border : भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या एका चीनी सैनिकाचा हिंदी गाणे गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.शाहरुख खानच्या 'मोहब्बतें' चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे.
Viral Video : युद्ध नाही...तर यावेळी भारत- चीन सीमेवर रंगली शाहरुखच्या गाण्याची मैफिल; व्हिडिओ झाला व्हायरल
Viral Video : युद्ध नाही...तर यावेळी भारत- चीन सीमेवर रंगली शाहरुखच्या गाण्याची मैफिल; व्हिडिओ झाला व्हायरलchatgpt
Published On

प्रत्यक्ष युद्धभूमी किंवा दोन देशांच्या सीमेवर कायम तणाव बघायला-ऐकायला मिळतो.. कधी-कधी तर नुसता गोळ्यांचा धाडधाड आवाज..पण कधी एखादं रोमँटिक गाणं ऐकलंय का? भारत-चीन सीमेवरचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सीमेवरचा असल्याचा दावा केला जातोय. एका चिनी सैनिकाला शाहरूख खानवर चित्रित झालेलं मोहब्बतेंमधल्या गाण्याचा 'खुमार' चढलाय. चक्क त्यानं ते गाणं गायलंय. ते पण अगदी तालासुरात... साधारण सात दशकांपूर्वी भारत-चीनमधील सौहार्दाच्या द्विपक्षीय संबंधांच्या अपेक्षांकरिता 'हिंदी-चीनी भाई भाई'चा नारा देण्यात आला होता. तो युद्धानंतर संपुष्टात आला असला तरी, या व्हायरल व्हिडिओमधून तो आता अनुभवायला मिळतोय.

९० च्या दशकात बॉलिवूडमधल्या गाजलेल्या गाण्यांनी संपूर्ण जगााला वेड लावले. आपल्या सुरांच्या तालावर सगळ्यांना नाचायला मजबूर केले. गाण्यांनी तर प्रत्येकावर छाप पाडली. आजही ही गाणी अनेकांना भूरळ घालतात. अशीच भूरळ चीन आणि भारतच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना सुद्धा पडली आहे.

Viral Video : युद्ध नाही...तर यावेळी भारत- चीन सीमेवर रंगली शाहरुखच्या गाण्याची मैफिल; व्हिडिओ झाला व्हायरल
VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर मालकाला बसला झटका, VIDEO व्हायरल

भारतीय अभिनेता शाहरूख खानने गाजवलेला काळाची जादू आजही कायम तशीच आहे.आजची पीढी देखील त्याची तितकीच मोठी फॅन आहे. भारत आणि चीनच्या सीमेवरसुद्धा शाहरूख खान आणि त्याच्या गाण्याची क्रेझ कायम आहे. हे या व्हायरल व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे.एक चीनी सैनिक प्रसिद्ध बॉलिवूड सिनेमांपैकी एक असलेल्या मोहबत्ते या सिनेमातील आंखे खूली हो या बंद हे गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या तोडक्या मोडक्या हिंदीत सैनिक हे गाणे गाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या शेजारी असलेल्या एका भारतीय सैनिकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. संगीताला कोणतीच मर्यादा नसते, ना भाषेची, ना सीमेची हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Viral Video : युद्ध नाही...तर यावेळी भारत- चीन सीमेवर रंगली शाहरुखच्या गाण्याची मैफिल; व्हिडिओ झाला व्हायरल
VIDEO VIRAL : धावत्या ट्रेनमध्ये पंडितजींनी थाटली पूजा, एसी कोचमध्ये पेटवला दिवा अन्..., VIDEO होतोय व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची अधिकृत माहिती नसली सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हारयल होत आहे.यावर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी याला सैनिकांचा एकमेकांच्या देशाविषयी असलेला आदर म्हणाले आहेत तर काही लोकांनी बॉर्डरवर अशी दृश्ये फार कमी बघायला मिळतात अशा कमेंट्स देखील केल्या आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com