VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर मालकाला बसला झटका, VIDEO व्हायरल

ज्वेलर्सच्या दुकानातून लाखोंचे दागिने गायब झाले. चोरी झाली, चोरी झाली अशी बोंबही उठली. पोलिसांत जायचं की नाही असा प्रश्न मालकाला पडला. पण त्याआधी सीसीटीव्ही फुटेज बघितले. शेवटी या चोरीचा उलगडा झाला. चोर कोण होते, कशी चोरी झाली, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल
VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरलchatgpt
Published On

चोरी झाली, चोरी झाली अशी सकाळी सकाळी बोंब उठली. ठिकाण होतं कर्नाटकातल्या तुमकुरू येथील विश्वास ज्वेलर्स...सकाळी ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांनी दुकानाचं शटर उघडलं. दुकानात शिरल्या शिरल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की दागिने चोरीला गेले. त्या दागिन्यांची किंमत होती तब्बल १० लाख रुपये. मग सुरू झाली फोनोफोनी. दुकानात नुकता कल्लोळ माजला. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आणि थोडी भीतीही होती. चोरी तर झालीय. पण ती केली कुणी? दागिने लंपास कोणी केले? अशा एक ना अनेक प्रश्नांचा काहूर त्या कर्मचाऱ्यांच्या मनात माजला. आता चोरीची तक्रार पोलिसांत करायलाच हवी, असं त्या कर्मचाऱ्यांच्या मनात आलं. नेमकं काय करावं कुणालाही सूचत नव्हतं. इतक्यात एकदा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, असं लक्षात आलं. फुटेज तपासले. चोरी तर झाली होती. चोरही त्या व्हिडिओत दिसत होते. कॅमेऱ्यात कैद झालेले ते चोर बघून सगळेच एकमेकांकडे बघायला लागले. चोरांचे चेहरे बघून खरे तर टेन्शन वाढतं. पण या कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोराला बघून मालकाचा जीव भांड्यात पडला. या चोरीचा आणि चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता नेमकं घडलं काय?

विश्वास ज्वेलर्समधून दहा लाखांचे दागिने चोरीला गेले. त्यामुळे सकाळी जो कर्मचारी आला त्याच्या तर पायाखालची वाळूच सरकली. चोरी झाल्याची बोंब उठली. विशेष म्हणजे दुकानाचे शटर सहीसलामत होते. काही तोडफोड झालेली नव्हती. टाळं वैगेरे सगळं ठिकठाक होतं. मग दागिने गायब कसे झाले, चोर आत कसे घुसले? असा प्रश्न त्या कर्मचाऱ्यांना पडला.

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल
VIDEO VIRAL : धावत्या ट्रेनमध्ये पंडितजींनी थाटली पूजा, एसी कोचमध्ये पेटवला दिवा अन्..., VIDEO होतोय व्हायरल

ज्वेलर्समध्ये सकाळी सकाळी तणावाचं आणि भीतीचं वातावरण होतं. पोलिसांत जायला तर हवं. पण त्याआधी एकदा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून बघूया असं कर्मचाऱ्याच्या मनात आलं. फुटेज बघितल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चोर दुसरा तिसरा कुणी नाही, तर चक्क उंदीर होता. त्यानंच दागिन्यांवर डल्ला मारला होता, असं दिसून आलं. तो उंदीर एकेक दागिना उचलून बिळात म्हणजे आपल्या निवासस्थानी नेत असल्याचं दिसून आलं. फुटेजच्या आधारे मग कर्मचाऱ्यांनी उंदराच्या बिळाचा शोध घेतला. त्यात सोन्याच्या १० अंगठ्या आणि तीन चेन मिळाल्या. त्यानंतर त्या ज्वेलर्स मालकाचा जीव भांड्यात पडला. उंदराने केलेल्या चोरीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल
Viral Video: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू, हा किळसवाणा VIDEO पाहून तुम्ही सोया चाप खाणं सोडाल
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com